Google Ad
Editor Choice

अॅड. अश्विनी बोगम यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषदेच्या पुणे जिल्हा प्रभारी पदी निवड

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ नोव्हेंबर) : हडपसर १२ वी बोर्डात पुण्यात प्रथम येण्यापासून ते एल. एल. एम (लॉ) पर्यंत रँक होल्डर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व निस्वार्थ समाजसेवेची आवड असणाऱ्या अॅड. अश्विनी बोगम यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषद पुणे जिल्हा प्रभारी पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. अध्ययन कायदा आणि कॉर्पोरेटच्या विविध क्षेत्रातील अनुभवाचा उपयोग करून सर्वसामान्य लोकापर्यंत कायद्याचे न्यान सोप्या पद्धतीने पोहोचवून समुपदेशन व कायदेविषयक मार्गदर्शन करणे हे त्यांचे ध्येय आहे.

सामाजिक जनजागृती निर्माण करणे असे कार्य अॅड. अश्विनी बोगम यांचे आहे. समाजातील गरजवंतांना मदत करणे असहाय्य व दीन-दुबळयावर होणाऱ्या अन्यायांना थांबवणे, नागरिकांच्या कायदेशीर हक्कांचे संरक्षण करून त्यांना न्याय प्रदान करणे, तसेच वाढती गुन्हेगारी महिला, लहान मुलांवरील अत्याचारांना आळा घालून मानवी हक्कांना जतन करून समाजासाठी उपयुक्त अशी सर्व कामे या संघटनेच्या माध्यमातून प्राथमिकतेवर केली जाणार असल्याचा विश्वास ऍड. अश्विनी बोगम यांनी व्यक्त केला.

Google Ad

संघटनेचे मुख्य उद्देश आणि फायदे :-

समाजाला गुन्हेगारी व गुन्हेगारांपासून मुक्त करणे, नागरिकांना कायदेशीर हक्क आणि योग्य न्याय देणे, जनतेच्या मनातून पोलिसांबद्दलची भीती दूर करणे, गरीब आणि असहाय लोकांना मदत करणे, महिलांवरील अत्याचार थांबवणे, समाजात प्रचलित असलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालणे, लोकांना त्यांच्या हक्कांबद्दल जागरूकता, समाजात प्रचलित असलेल्या कामगारांच्या शोषणाला प्रतिबंध, पीडितांना एफआयआर दाखल करण्यास मदत करणे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!