Google Ad
Editor Choice

सध्या नागरिकांचा कल आयुर्वेद उपचार पध्दतीकडे वाढलाय – सौ. कुंदाताई भिसे..

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ६ नोव्हेंबर २०२२) :- उन्नती सोशल फाउंडेशन व ऑल सिनियर सिटीजन्स असोशिएशन यांच्या वतीने पिंपळे सौदागर येथील रोज आयकॉन कमर्शिअलमध्ये रविवारी (दि. ६) रोजी सकाळी ११ ते सायं. ७ पर्यंत मोफत आयुर्वेद निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान डॉ. योगेश जोशी व डॉ. मृणालिनी जोशी यांच्या आयुष्मान आयुर्वेद हॉस्पिटलचे उदघाटन उन्नति सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. कुंदाताई संजय भिसे यांच्या हस्ते करण्यात आले.

या शिबिरात मोफत अस्थी घनता (bone density) तपासणी, मोफत आयुर्वेद निदान व सल्ला, मोफत गर्भसंस्कार कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. आयुर्वेद औषधे, गर्भवती महिलांसाठी पंचकर्म उपचार, महिलांसाठी घरगुती आयुर्वेद औषधी निर्माण, आयुर्वेद, पाककृती शिबिर व सवलतीच्या दरात औषधांचे वाटप करण्यात आले.

Google Ad

यावेळी उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. कुंदाताई संजय भिसे, फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे, डॉ. योगेश जोशी, डॉ. मृणालिनी जोशी, ऑल सिनियर सिटीजन्स असोसिएशनचे अध्यक्ष रमेश वाणी, विठाई वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. सुभाषचंद्र पवार, आनंद हास्य क्लबचे राजेंद्रनाथ जयस्वाल विजय भांगरे, सचिन साठे, अनिल कुलकर्णी, सतिश पिंगळे, सिनियर सिटीजन्स असोसिएशचे पदाधिकारी, उन्नती सोशल फाउंडेशनचे बहुसंख्य सभासद व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

सौ कुंदाताई भिसे म्हणाल्या, आजच्या धकाधकीच्या जीवनात कोणाला कुठला आजार केव्हा जडेल ते सांगता येत नाही. आजार मुळासकट उपटून टाकण्यात सध्या आयुर्वेद उपचार पद्धती महत्वाची भूमिका निभावीत आहेत. शिवाय उपचाराचा खर्चही खिशाला परवडणारा असल्यामुळे नागरिकांचा आयुर्वेद उपचार पध्दतीकडे कल वाढला आहे.फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे म्हणाले, आयुष्मान आयुर्वेद रुग्णालय हे पिंपळे सौदागर परिसरातील एकमेव आयुर्वेद रुग्णालय आहे. येथे सर्व आयुर्वेद उपचारांसाठी वैद्यकीय विमा उपलब्ध.करून देण्यात येतो. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!