Google Ad
Editor Choice

नवी सांगवीत शिवाजी पार्कमध्ये एमएनजीएल गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकामाचे भूमिपूजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ नोव्हेंबर) : पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवी येथील छत्रपती शिवाजी पार्क लेन नं. २ मध्ये एमएनजीएल गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकामाचे भूमिपूजन आज करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक नवनाथ जगताप यांच्या हस्ते ४०० मीटर हुन अधिक एमएनजीएलची मुख्य गॅस पाईपलाईन टाकण्याच्या खोदकामाचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी परिसरातील सोसायट्यांमधील नागरिक उपस्थित होते.

महापालिका तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत सांगवी पिंपळे गुरव परिसरात मुख्य रस्त्यावरून एमएनजीएल कंपनीच्या वतीने गॅस पाईपलाईन टाकण्यात आली आहे. मात्र अंतर्गत रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी पाईपलाईन टाकण्याची कामे रखडली आहेत. माजी नगरसेवक नवनाथ जगताप यांच्या हस्ते नवी सांगवीतील छत्रपती शिवाजी पार्क लेन नं. २ मध्ये अंतर्गत रस्त्यावर एमएनजीएल गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकामाचे भूमीपुजन करून कामकाज सुरू करण्यात आले.

Google Ad

येथील अंतर्गत रस्त्यावर ६३ एमएम असणारी गॅस पाईपलाईन असून साधारण ४०० मीटर हुन अधिक लांब मुख्य गॅस पाईपलाईन रस्त्याच्या कडेने टाकण्यात येणार आहे. तसेच सोसायट्यांमधील फ्लॅट धारकांसाठी कनेक्शन देताना १२ एमएमची गॅस पाईपलाईन टाकून देण्यात येणार आहे. मुख्य पाईपलाईन टाकण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी लागणार असून सोसायटीतील फ्लॅटधारकांना कनेक्शन मिळण्यास एक महिन्याचा कालावधी लागेल. अशी माहिती याप्रसंगी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

नवी सांगवीतील छत्रपती शिवाजी पार्क लेन नं. २ मधील अंतर्गत रस्त्यावर दुतर्फा बाजूस असणारे आनंद पार्क, मिऱ्याकल क्लासिक, ओम रेसिडेन्सी, शंकराई पार्क, सूर्योदय अपार्टमेंट, जयराम पार्क, परदेशी रेसिडेन्सी, राज प्लाझा, बालाजी अपार्टमेंट व इतर रहिवाशी असणारे जवळपास पाचशे हुन अधिक फ्लॅट धारकांना एमएनजीएल गॅस पाईपलाईन कनेक्शन घेण्याचा लाभ मिळणार आहे.  परिसरातील नागरिकांनी माजी नगरसेवक नवनाथ जगताप यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला तसेच उपस्थित नागरिकांनी नवनाथ जगताप यांचे याप्रसंगी आभार मानले.

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!