Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

Pune : सराईत गुन्हेगाराचा खुन करुन पसार झालेल्या आरेपींना … युनिट ४ गुन्हे शाखा पुणे यांच्या पथकाने अवघ्या एका तासात केले जेरबंद!

महाराष्ट्र 14 न्यूज : दि ०३ एप्रिल २०२१ रोजी सह पोलीस निरीक्षक जमदाडे , पोहवा साळुके , पोना खुणवे , पोहवा शेख , पोना साबळे पोना कराळे , मपोना नेवसे , पोशि वाघमारे असे विमानतळ पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलिग करित असताना , माहिती मिळाली की , लोहगाव , खेसे पार्क येथे एका इसमांवर खुनी हल्ला झालेला आहे .

यावेळी सर्वजण स्टाफसह घटनास्थळावर पोहचले . घटनास्थळी माहिती मिळाली की , स्विफ्ट कारमधून आलेल्या पुरुष व महिलेने सुमित जगताप याचेवर खुनी हल्ला केलेला आहे.तो जखमी बेशुध्द अवस्थेत पडला असताना स्थानिक पोलीस त्यास ससून हॉस्पीटलमध्ये घेऊन गेलेले आहेत . सोबतचे स्टाफ मधील पो.हवा गणेश साळुके व पो.ना राकेश खुणवे यांना त्यांचे बातमीदारामार्फत पुढील माहिती मिळाली की , खेसे पार्क , लोहगाव येथील खुनी हल्ल्यात महिला नामे शबनम शेख व तिचे साथीदारांचा सहभाग आहे ते सर्व लेडी डॉन असे लिहीलेल्या पांढ-या रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये शासकिय दुध योजना खडकी समोर आहेत ते पळुन जाण्याच्या तयारीत आहेत.

Google Ad

अशी खात्रीशिर माहिती मिळताच मा . वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनिश निर्मल गुन्हे शाखा , युनिट ४ , पुणे शहर यांचे सुचनाप्रमाणे शासकिय दुध योजना खडकी , पुणे येथे जाऊन सदर कारचा शोध घेतला असता , सदर कारमध्ये एक महिला व दोन पुरुष बसलेले दिसुन आले . त्यांना अच्यानक छापा घालुन सर्व पोलीस स्टाप चे मदतीने पकडुन त्यांची नावे विचारली असता , महिलेने तिचे नाव शबनम हनिफ शेख रा . गुरुव्दारा , भुकन वस्ती , गल्ली नं . बी / १३ , लोहगाव पुणे असे असल्याचे सांगितले तिचे सोबत असलेल्या इसमांनी आपली नावे मोहम्मद हुसेन मोहम्मद शरीफ कुरेशी रा . गुरुव्दारा , खरात कॉम्पलेक्स , तळ मजला , रुम नं . १ , लोहगांव , पुणे व सलीम मुर्तीजा शेख रा . गुरुव्दार , वस्ती , लोहगाव , पुणे अशी असल्याचे सांगितले .

🔴 नवी सांगवी फेमस चौक येथे 1 BHK फ्लॅट भाड्याने देणे आहे.
संपर्क : – 8️⃣9️⃣9️⃣9️⃣2️⃣8️⃣4️⃣8️⃣9️⃣5️⃣

 

त्यांना पुढील चौकशी करिता गुन्हे शाखा , युनिट ४ कार्यालय येथे घेऊन आलो . त्यांच्याकडे कसोशिने चौकशी करिता त्यांनी सांगितले कि , महिला शबनम शेख हिने तिचा मित्र नामे सुमित जगताप रा . लोहगाव , पुणे याच्याशी पुर्वी भांडण झाले होते . तो शबनम हिस वारंवार त्रास देत होता म्हणुन त्या कारणावरुन आम्ही तिघांनी व आमचा साथीदार सनी गाडे याचेसह मिळुन लाकडी दांडक्याने व धारधार हत्याराने सुमित जगताप यास मारहाण करुन गंभीर जखमी केले . असे सांगितले . त्यांनंतर त्यांना विमानतळ पोलीस स्टेशन गुरनं १०५/२०२१ भादविक ३०२,३४ या गुन्हयाच्या पुढील तपास कामी कारसह ताब्यात दिले.पुढील तपास विमानतळ पोलीस स्टेशन करत आहे .

सदरची कारवाई मा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता , मा . अपर पोलीस आयुक्त , गुन्हे श्री.अशोक मोराळे , मा पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री.श्रीनिवास घाडगे , सहा पोलीस आयुक्त गुन्हे -२ श्री लक्ष्मण बोराटे , पोलीस निरीक्षक श्री रजनिश निर्मल यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक , संदिप जमदाडे , पोहवा गणेश साळुके , पोहवा राजेस शेख , पोना.राकेश खुणवे पोना प्रविन कराळे सुरेंद्र साबळे मपोना नेवसे , पोशि सागर वाघमारे यांनी केली आहे .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

22 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!