Google Ad
Editor Choice Maharashtra

Ambegaon : पुणे जिल्ह्यातील आंबेगावाच्या लढवय्या नेत्याचा कसा आहे … बँकेची निवडणूक ते गृहमंत्रिपदापर्यंतचा प्रवास!

महाराष्ट्र 14 न्यूज : राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांच्या बद्दल ज्या ज्या वेळी चांगली बातमी पुढे येते त्या त्या वेळी तालुक्यात हमखास एक धून उमटते ती म्हणजे ,”आंबेगावात गाजा वाजा, दिलीप राव एकच राजा!”..आणि आज तर पुन्हा एकदा दिलीप वळसे पाटील यांचं नाव पुढे आलं आणि पुन्हा एकदा हीच धून सर्वत्र ऐकायला मिळाली.

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर राज्याच्या गृहमंत्रिपदाची माळ राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांच्या गळ्यात पडली आहे. दिलीप वळसे पाटलांकडे सध्या उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी आहे. पण गृहमंत्रिपद मिळाल्यानंतर ही जबाबदारी अजित पवार यांच्यावर देण्यात आली आहे. अजात शत्रू, संयमी आणि अभ्यासू नेतृत्व अशी ओळख असलेले दिलीप वळसे पाटील यांच्याबद्दल..

Google Ad

🔴कौटुंबिक परिस्थिती आणि शिक्षण

दिलीप वळसे पाटील यांचं जन्मगाव आहे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेलं एक छोटं खेडेगाव. गावाचं नाव आहे निरगुडसर. वळसे पाटील यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. लहानपनापासूच त्यांना समाजकार्याची पार्श्वभूमी आहे. प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यांचे शिक्षण बीए (ऑनर्स ),पत्रकारितेतील पदविका, एल.एल.बी, एल.एल. एम. आहे.

🔴 नवी सांगवी फेमस चौक येथे 1 BHK फ्लॅट भाड्याने देणे आहे.
संपर्क : – 8️⃣9️⃣9️⃣9️⃣2️⃣8️⃣4️⃣8️⃣9️⃣5️⃣

दिलीप वळसे पाटील यांच्या वडिलांना ‘दादा’ तर दिलीप वळसे पाटलांना या भागात ‘साहेब’अशी ओळख आहे. वडिलांकडून त्यांनी राजकारणाचा वसा घेतला. मुंबईत बी.ए ,एल.एल.एमची पदवी संपादन केल्यावर तेव्हाच्या पुलोदची धुरा त्यांनी सांभाळली. सत्तेवर नसताना शरद पवार यांच्या सोबत काम करत समाजकारण व राजकारणातील बारकावे हेरले. त्यांच्या आयुष्यातली पहिली निवडणूक होती ती मंचर येथील शरद सहकारी बँकेच्या संचालकपदाची निवडणूक.

राजकीय प्रवास
1983 पासून ते शरद सहकारी बँकेच्या संचालकपदी आहेत. 1990 पासून ते आजतागायत सलग 7 वेळा आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे कायमस्वरूपी प्रतिनिधित्व करत आहेत. विधिमंडळ सरचिटणीस पद त्यांनी भूषविले आहे. 1999 पासून उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री, 2001 पासून ऊर्जा खात्याचा कार्यभार, नोव्हेंबर 2004 पासून ऊर्जा मंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री, तसेच डिसेंबर 2008 पर्यंत उच्च आणि तंत्र शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी त्यांनी पेलली आहे. 1990 मध्ये आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेची पहिली निवडणूक लढवली आणि मागील सलग 30 वर्षे ते आंबेगावचे आमदार म्हणून निवडून आले.

आमदार असताना उत्कृष्ट संसदपटू ठरण्याचा मान त्यांना मिळाला. तंत्रज्ञानाची नवी दालने खेड्यापाड्यापर्यंत पोहोचावी यासाठी नॉलेज कार्पोरेशन ही वळसे-पाटील यांच्या दूरदृष्टी ची देणगी आहे. महाराष्ट्राच्या शैक्षणिक धोरणाला नवी दिशा देता याावी यासाठी त्यांनी नॅशनल सेंटर फॉर रूरल डेव्हलपमेंट या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली आणि आज एक आदर्श शैक्षणिक संस्था म्हणून या संस्थेने नावलौकिक कमविला आहे. ज्या संस्थेकडे आदराने पाहिले जाते त्या रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापककीय मंडळावर निवड झाल्यामुळे तिथेही सक्रिय योगदान देत आहेत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे ते ट्रस्टी आहेत.

🔴 नवी सांगवी फेमस चौक येथे 1 BHK फ्लॅट भाड्याने देणे आहे.
संपर्क : – 8️⃣9️⃣9️⃣9️⃣2️⃣8️⃣4️⃣8️⃣9️⃣5️⃣

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे ते संस्थापक आहेत. आंबेगाव तालुक्यात राबवलेली पडकई योजना भागातील आदिवासी बांधवांना वरदान ठरलेली आहे. डिंभे धरण आणि अनेक शिवकालीन बंधारे व अनेक बंधाऱ्यांची निर्मिती करून पाण्याचे साठे आणि पाईपलाईनचे जाळे निर्माण केले. तसंच दुग्ध व्यवसायाची साखळी निर्माण करून आंबेगाव तालुक्याचे आर्थिक स्थिती तर उंचावली पण तालुक्यातील महिलांना स्वावलंबी बनवले. रस्ते, पाणी, वीज, शाळा, सर्वच आघाड्यांवर आंबेगाव तालुका सर्वात पुढे आहे त्याचे श्रेय दिलीप वळसे-पाटील यांना जाते.

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, महाराष्ट्र शुगर फेडरेशनचे संचालक आणि आणि नॅशनल शुगर फेडरेशनचे अध्यक्ष ते झाले आहेत. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री म्हणून काम करताना त्यांनी शिक्षण विभागाला एक नवी दिशा आणि आधुनिकता दिली. ऊर्जामंत्री असताना महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ या मरणासन्न मंडळाला एक नवीन ऊर्जा दिली. राज्यातील प्रगतीला हातभार लावणाऱ्या वीज मंडळाचे चार कंपन्यांमध्ये रूपांतर करून आपल्या कार्यकर्तृत्वाचा त्यांनी ठसा उमटवला. वित्त मंत्री असताना वित्तीय शिस्त काय असते याचा मार्ग दाखवुन दिला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कायदे मंडळाच्या सभागृहाला एक नवी दिशा आणि प्रतिष्ठा मिळवून दिली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1,887 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!