Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्वयंसेवकांमार्फत शहरात राबविणार … ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ मोहीम!

महाराष्ट्र 14 न्यूज, ( १५ सप्टेंबर २०२० ) : कोरोना विषाणूला हरविण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार राबविण्यात येणारी ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ हि मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे , आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी केले .

राज्य शासनाच्या निर्देशानुसार शहरामध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी हि मोहीम दि . १५ सप्टेंबर ते २४ ऑक्टोबर २०२० दरम्यान राबविण्यात येणार आहे . त्याच्या नियोजनाची आढावा बैठक आज स्थायी समिती सभागृहामध्ये पार पडली त्यावेळी ते बोलत होते . या बैठकीस उपमहापौर तुषार हिंगे , सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके , स्थायी समिती सभापती संतोष लोंढे , विरोधी पक्षनेते राजू मिसाळ , मनसे गटनेते सचिन चिखले , आयुक्त श्रावण हर्डीकर , नगरसदस्य विलास मडीगेरी , अभिषेक बारणे , राजेंद्र गावडे , अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील , अजित पवार , प्रवीण तुपे , अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ . पवन साळवे , महिला वैद्यकीय अधिकारी डॉ . वर्षा डांगे , सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते .

Google Ad

महापौर उषा उर्फ माई ढोरे म्हणाल्या , माझे कुटुंब माझी जबाबदारी हि मोहीम शहरात राबविण्यात येणार आहे . या मोहिमेमुळे कोरोना विषाणूची साखळी तोडून कोरोना आटोक्यात आणण्यास मदत होईल . कोरोनामुक्त शहर करण्यासाठी शहरातील नागरिकांनी या मोहिमेस सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले .

‘आमदार लक्ष्मण जगताप’ म्हणाले , माझे कुटुंब माझी जबाबदारी हि मोहीम १०० % यशस्वी करण्यासाठी दिवसाला किमान २५ घरांना स्वयंसेवकांनी भेटी देणे आवश्यक आहे . यासाठी जास्तीत जास्त पथकांची नियुक्ती करावी . काम करण्या – या स्वयंसेवकांना मानधन द्यावे अशा सूचनाही त्यांनी केल्या .

 

‘आमदार महेश लांडगे’ म्हणाले , या मोहिमेमध्ये सहभागी होणा – या कर्मचा – यांना वाढीव अतिकालीन भत्ता द्यावा . ५० वर्षांपुढील लोकांची स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करू नये तसेच काम करण्या – या स्वयंसेवकांना कोरोना योद्धा म्हणून सुरक्षा कवच देण्यात यावे . प्रत्येक पथकामध्ये एक महिला , एक पुरुष स्वयंसेवक व मनपा कर्मचारी असावा असेही ते म्हणाले .

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले , १२ स्वयंसेवक प्रत्येक लोकप्रतिनिधींकडून व १२ स्वयंसेवक महिला बचत गटांकडून घेण्याचे नियोजन आहे . स्वयंसेवकांना किमान १० वी पास व स्मार्टफोन वापराचे ज्ञान असणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले . माझे कुटुंब – माझी जबाबदारी हि मोहीम दोन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणार असून पहिला टप्पा दि . १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२० दरम्यानचा असेल तर दुसरा टप्पा १४ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर २०२० दरम्यान असेल .

यामध्ये मनपा कार्यक्षेत्रातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी , कोमोर्बिड आजार असल्यास उपचार आणि प्रत्येक नागरिकास व्यक्तीशः भेटून आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे . कुटुंबातील प्रत्येक सदस्याना तापमान SpO2 तपासणे , Comorbid Condition , ताप खोकला , दम लागणे आदी आजारांबाबतची माहिती घेवून त्यांना कोविड सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींना जवळच्या फिवर क्लिनिक मध्ये संदर्भित करण्यात येणार आहे . या मोहिमेअंतर्गत शहरातील २४ लाख ७६ हजार ४८३ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून २१६६ स्वयंसेवकांच्या मदतीने हि मोहीम यशस्वी करण्याचे नियोजन महानगरपालिकेने आखले आहे .

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

10 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!