Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड मनपा अधिकारी, कर्मचारी व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना देणार प्रोत्साहन भत्ता … महापौर माई ढोरे

महाराष्ट्र 14 न्यूज : आज करोना रुग्णांसाठी पडेल ते काम / सेवा डॉक्टरांकडून तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांकडून करून घेतली जाते. अगदी कोरोनाच्या पॉझिटीव्ह रुग्णांना त्यांच्या घरापासून रुग्णांलयांपर्यंत सर्व सेवा या लोकांना जबाबदारीने करावी लागते. करोना रुग्ण तपासणी तसेच शहरातील घरोघरीचे सर्वेक्षण करण्यापर्यंत सर्व कामे अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर आपल्या जीवाची, कुटुंबाची पर्वा नकरता गेली सहा महिने अखंडपणे करत आहेत. त्यांच्या या सेवाकार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहनपर भत्ता देण्यात यावा अशी मागणी सातत्याने होत होती.

कोरोनामुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीत देखील जिवाची पर्वा न करता कामावर हजर राहून आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडल्याबद्दल अधिकारी , कर्मचारी व वैद्यकीय कर्मचारी यांना दैनंदिन र.रु. १५० / – प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार असल्याची माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली . पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात कोरोना ( कोविड -१ ९ ) विषाणूचा वाढत्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी विविध प्रतीबंधानात्मक उपाय योजनेअंतर्गत काम केलेल्या कर्मचा – यांना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर येणे – जाणे , जेवण – खाण इ . साठी हा प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार असल्याचे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी सांगितले .

Google Ad
Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

71 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!