Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

कोरोना आपत्तीत मदतीचा हात … रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी यांच्या वतीने पीपीई किट सॅनिटायझर, N 95 मास्कचे वाटप!

महाराष्ट्र 14 न्यूज : रोटरी क्लब ऑफ वाल्हेकर वाडी यांच्या वतीने आज संत मौनी बाबा आश्रम गुरुद्वारा वाल्हेकर वाडी, व किनारा वृद्धाश्रम तळवडे यांना पी पी ई किट, सॅनिटायझर, N 95 मास्क तसेच प्रभाग क्रमांक १७ मधील पिं चिं मनपा च्या १०० आरोग्य विभागाचे साफसफाई आरोग्य कर्मचारी यांना N ९५ मास्कचे वाटप करण्यात आले, डिस्ट्रिक्ट 3131 चे माजी गव्हर्नर श्री.रवीजी धोत्रे व रोटरी क्लब ऑफ निगडी चे माजी प्रेसिडेंट श्री.विजय काळभोर, रोटरी क्लब वाल्हेकरवाडी चे माजी प्रेसिडेंट श्री. सोमनाथ हारपुडे यांच्या सहकार्याने कोरोना आपत्तीत मदत म्हणून सदरचे साहित्य रोटरी क्लब ऑफ वाल्हेकर वाडी यांना प्राप्त झाले होते, यातील काही पी पी ई किट व सॅनिटायझर ची मदत पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या बजरंग दल पिंपरी चिंचवड यांना देण्यात आली.

यावेळी अस्टिटंट गव्हर्नर श्री. संतोष अग्रवाल, रोटरी डिस्ट्रिकचे रो. चंद्रकांत पाटील,रो. विजय काळभोर,रोटरी क्लब ऑफ वाल्हेकर वाडी चे प्रेसिडेंट श्री.सचिन काळभोर, सेक्रेटरी श्री.सचिन खोले, युथ डायरेक्टर श्री. शेखर चिंचवडे, बजरंग दल व विश्व हिंदू परिषद चे श्री. कुणाल साठे व श्री. संजय शेळके आयटी डायरेक्टर श्री.वसंत ढवळे, लिटरसी डायरेक्टर श्री.गणेश बोरा, सुयोग वाल्हेकर, गुरुद्वारा चे संचालक ज्वाला अंकल, श्री.मन्ना सिंग, किनारा वृद्धाश्रम च्या संचालिका प्रीती वैद्य, रेखा विकास देशमुख या मान्यवरांच्या उपस्थितीत सदर साहित्याचे वितरण करण्यात आले या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी चार्टड रो.प्रदीप वाल्हेकर, रो.वनिता सावंत, ओम प्रतिष्ठान यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

16 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!