Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

Phaltan : आईवर एकतर्फी प्रेमातून … युवकाने केली १० महिन्याच्या बाळाची हत्या!

महाराष्ट्र 14 न्यूज : सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील काळज गावच्या १० महिन्यांच्या चिमुकल्याचे अपहरण करण्यात आले . यानंतर त्याचा खून केल्याची संतापजनक घटना दोन दिवसापूर्वी घडली होती . दरम्यान भगत कुटुंबाच्या घराजवळील विहिरीत बाळाचा मृतदेह वडिलांना आढळून आला . त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्र वळवत आणि गावाजवळ असलेल्या एका संशयिताला ताब्यात घेतले .

पोलिसांनी कसून चौकशी केल्यांनतर या प्रकरणाला वेगळं वळण असल्याचं समोर आले . १० महिन्याच्या ओमचा खून हा त्याच्या आईवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या २८ वर्षीय युवकाने केला असल्याच समोर आले आहे . ओमच्या आईवर या तरुणाचे एकतर्फी प्रेम होते . मात्र ओंमची आई त्याला कोणताच प्रतिसाद देत नव्हती .

Google Ad

भेटणं बोलणंही टाळत होती . या रागातून आरोपीने ओमच अपहरण केले आणि त्याच दिवशी त्याची हत्या करत मृतदेह विहिरीत फेकला . याप्रकरणी लोणंद पोलिस ठाण्यात अपहरण करून खून केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या प्रकरणात अजून काही धागेदोरे मिळतायत का याचा शोध पोलिस घेत आहेत .

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!