Google Ad
Editor Choice Maharashtra

यंदा राज्यात सरासरी १६ टक्के अधिक पाऊस … राज्यातील काही जिल्ह्यात ओला दुष्काळ

महाराष्ट्र 14 न्यूज : राज्यात यंदा १ जून ते ३० सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत सरासरीच्या १६ टक्के अधिक पाऊस झाला आहे . देशात सरासरीच्या ९ टक्के पाऊस झाला आहे . महाराष्ट्रात ३६ पैकी ३३ जिल्ह्यांत समाधानकारक पाऊस झाला आहे . अकोला , अमरावती , यवतमाळ या तीनच जिल्ह्यांत खूप कमी पासून झाला आहे .

राज्यातील नऊ जिल्ह्यांत ओला दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.राज्यात अहमदनगर , औरंगाबाद , मुंबई या ठिकाणी सर्वात जास्त पावसाची नोंद झाली आहे.यंदा कोरोनाचा हाहाकार असला तरी पाऊस मात्र राज्यावर मेहेरबान झाला . राज्यातील ३६ पैकी ३३ जिल्ह्यांत समाधानकारक पाऊस झाला आहे . सर्वाधिक पाऊस अहमदनगर ( ८० टक्के ) , औरंगाबाद ( ६५ टक्के ) , मुंबई ( ५ ९ टक्के ) इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद चार महिन्यांत झाली आहे .

Google Ad

राज्यात अहमदनगर , औरंगाबाद , जालना , बीड , धुळे , जळगाव , सांगली , सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अतिपावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे . या भागात ओल्या दुष्काळासारखी परिस्थिती आहे . मागच्या वर्षी २०१९ मध्ये पुणे , कोल्हापूर , सांगली ही तीन शहरे महापुरामुळे ऑगस्ट महिन्यात पाण्याखाली गेली होती . मागच्यावर्षी राज्यात सरासरीच्या ३२ टक्के अधिक पाऊस झाला होता . यंदा मागच्या वर्षीपेक्षा १६ टक्के कमी पाऊस झाला आहे . त्यामुळे राज्यता कुठेही पूरस्थिती निर्माण झाली नाही .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!