Google Ad
Editor Choice Maharashtra

Nashik : ‘ भाई ‘ सुटल्याचा आनंद ! तुरुंगातून सुटलेल्या गुंडाच्या स्वागतासाठी नाशकात समर्थकांची गर्दी

महाराष्ट्र 14 न्यूज : नागपुरात गँगस्टरच्या अंत्ययात्रेला हजारोंच्या संख्येने गर्दी जमल्याची घटना ताजी असतानाच नाशिकमध्येही असाच काहीसा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. तुरुंगातून सुटलेला गुंड सिद्धेश अभंगेच्या स्वागतासाठी नाशिकमध्ये समर्थकांची गर्दी उसळली होती.

नाशिकच्या तुरुंगात शिक्षा भोगून झालेला ठाण्यातील कुख्यात गुंड सिद्धेश अभंगे याची कारागृहातून सुटका झाली. त्यानंतर अभंगेच्या स्वागतासाठी समर्थकांची तुफान गर्दी उसळली.

Google Ad

कार्यकर्ते आणि समर्थकांचा घोळका रस्त्यावर जमल्याने नाशिक जेल रोड परिसरात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. पोलिसांच्या नाकावर टिच्चून कारागृह परिसरातच स्वागत समारंभ झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कोण आहे सिद्धेश अभंगे?

सिद्धेश अभंगे हा ठाण्यातील कुख्यात गुंड आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. ठाणे पोलिसांनी गेल्या वर्षी त्याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई केली होती. त्यामुळे नाशिक मध्यवर्ती कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली होती.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!