Google Ad
Editor Choice Pune

Pune : सिक्युरीटीचा ड्रेस घालुन ए.टी.एम मधील बॅट – या चोरणारी सराईत टोळी खडक पोलिसांकडून गजाआड … २.३०,००० रु. चा मुद्देमाल हस्तगत!

महाराष्ट्र 14 न्यूज : दिनांक ३० सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ०६/३५ वा . चे सुमारास ०२ अनोळखी चोरटयांनी , सिक्युरीटीचा ड्रेस घालुन एच.डि.एफ.सी. बँके शाहु चौक शिवाजी रोड पुणे येथील ८०,००० / – रु किंमतीच्या एक्साईड कंपनीच्या एकुण ०८ बॅटरी चोरी केल्या होत्या , त्याप्रमाणे खडक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे .

दाखल गुन्हयाचा तपास करीत असतांना , तपास पथकाचे कर्मचारी बंटी कांबळे व समीर माळवदकर खडक पोलीस स्टेशन पुणे यांना त्यांचे बातमीदाराने बातमी दिली की , शाहु चौकातील ए.टी.एम मधील बॅट – या चोरणारे दोन इसम त्रिकोणी गार्डन घोरपडे पेठ पुणे येथे थांबलेले आहेत , अशी खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने त्यांनी १ ) भगवान विश्वनाथ सदार वय ३८ वर्षे सध्या रा.फ्लॅट नं ३०२ , गणराज हाईटर्स तिसरा मजला , पिंपळे गुरव पुणे मुळ रा.मुपो चतारी ता.पातुर जि.अकोला २ ) जगदीश जगदेव हिवराळे वय ३० वर्षे रा.मुपो बालापुर नवानगर बुध्द मंदीर जवळ जि . अकोला यांना स्टाफचे मदतीने ताब्यात घेवुन त्यांचेकडे गुन्हयात बाबत तपास करता त्यांनी गुन्हा केलेल्या कबुली दिल्याने त्यांना गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे .

Google Ad

त्यांची पोलीस रिमांड घेवुन तपास करता त्यांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली १,५०,००० / – रु किं ची एक सिल्व्हर रंगाची मारुती आल्टो गाडी क्रमांक एम एच १६ ए बी २१८१ व ८०,००० / – रु किं . च्या चोरलेल्या एक्साईड कंपनीच्या बॅट – या जप्त करण्यात आलेले आहेत . यातील अटक आरोपी भगवान विश्वनाथ सदार हा यापुर्वी सिक्युरीटी म्हणुन काम करीत होता,

त्यामुळे त्यास माहिती होते की , ए.टी.एम मधील बॅट – या कोठे ठेवता व कशा काढतात , त्याचा फायदा घेत त्याने कोणावर संशय येवु नये याकरीता सिक्युरीटीचा पोशाख धारन करून यापुर्वी अशा प्रकारचे १६ गुन्हे करुन लाखो रुपयांची मालमत्ता चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे . त्यांचेकडुन दाखल गुन्हयात एकुण २,३०,००० / – रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे . आरोपी भगवान विश्वनाथ सदार यांचेवर दाखल असलेल्या गुन्हयांची माहिती देण्यात आली यात

ही सर्व कारवाई ही डॉ . संजय शिंदे , अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे , डॉ प्रियंका नारनवरे , पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ व श्री . गजानन टोम्पे , सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशन चे श्री . भरत जाधव , वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.उत्तम चक्रे पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) तपास पथकाचे प्रभारी सहा पोलीस निरीक्षक श्री . सुशिल बोबडे , पोलीस उप निरीक्षक श्री . रतिकांत कोळी , पोलीस कर्मचारी , अजीज बेग , विनोद जाधव , गणेश सातपुते , संदिप पाटील , अमेय रसाळ , समीर माळवदकर , बंटी कांबळे , रवी लोखंडे , रोहन खैरे , योगेश जाधव , विशाल जाधव , दिपक मोघे यांचे पथकाने केली आहे .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

5 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!