Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

दापोडीगावा करिता जलसंपदा विभागाच्या जागेत छोटेसे उद्यान व सामाजिक कार्यालय विकसित करण्यात यावे … अजितदादा पवार यांच्याकडे ‘नगरसेविका स्वाती काटे’ यांनी केली मागणी!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरीचिंचवड शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होत असताना, शेजारून जाणारा पुणे मुंबई महामार्ग , रेल्वे मार्ग आणि आता नव्याने होत असलेेला पुणे पिंपरी चिंचवड मेट्रो मार्ग हा सुद्धा दापोडीतूनच जात आहे. शहराचा हा वाढता विकास लक्षता घेता, जुने असणारे दापोडी गाव सुद्धा कात टाकू लागले आहे, आणि भविष्यातील गरज ओळखून स्थानिक नगरसेविका स्वाती उर्फ माई काटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील दापोडी येथील जल – संपदा विभाग ( पाट बंधारे खाते ) या विभागाचे क्षेत्रफळ जवळ जवळ ७७ एकर एवढे मोठे वर्कशॉप मागील बारा ते पंधरा वर्षापासून बंद ( ओसाड अवस्थेत ) असुन याच जागेत दापोडी गावठाण करिता उद्यान व सामाजिक कार्यालय विकसित करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

Google Ad

तसे निवेदन त्यांनी अजित पवार यांना दिले. जेणेकरून दापोडी गावातील दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या , ज्येष्ठ नागरिकांची वृद्धी , तरूण , युवक , युवती व लहान मुले – मुली यांना खेळण्यास , ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य लक्षात घेवुन एक सुशोभित उद्यान विकसित करणे व तसेच मध्यम वर्गीय जनतेच्या छोटे – छोटे कार्यक्रमांसाठी उपलब्ध होऊन याठिकाणी टिळा , वाढदिवस , सामाजिक धार्मिक , शैक्षणिक असे अनेक कार्यांसाठी एक कार्यालय विकसित करणेत यावे . अशी मागणी नगरसेविका स्वाती काटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

दापोडी परिसरात एक उद्यान असुन ते उद्यान गावापासून दुर अंतरावर आहे . त्यामुळे गावातील नागरिकांना जाणे – येणे होत नाही . उद्यानाचा लाभ घेता येत नाही . दापोडी गावाकरिता उद्यान व सामाजिक कार्यालय विकसित करून दापोडी गावास सर्वगुण संपन्न करावे असे या निवेदनात स्वाती काटे यांनी म्हटले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!