Google Ad
Editor Choice

पुण्यामध्ये निरंकारी संत समागमाचे आयोजन… हर्षोल्हसामध्ये तयारीचा आरंभ

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३० एप्रिल) : निरंकारी सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या मानव कल्याणार्थ प्रचार यात्रे दरम्यान पुणे शहरामध्ये आगमन होत आहे. या बातमीने समस्त संत निरंकारी परिवारामध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण असून हजारोंच्या संख्येने श्रद्धाळू भक्त या संत समागमाच्या तयारीला लागले आहेत. या विशाल संत समागमाचे आयोजन सोमवार, २ मे २०२२ या दिवशी सायंकाळी ५:०० ते ८:३० या वेळेत महालक्ष्मी लॉन्स, खराडी बायपास जवळ, वाघोली जकात नाका येथे संपन्न होणार असल्याची माहिती ताराचंद करमचंदानी (पुणे झोन प्रभारी) यांनी दिली.

निरंकारी भक्तगणांकडून पूर्ण उत्साहामध्ये समागमाच्या तयारीचा आरंभ झाला आहे, ज्यामध्ये समागम मैदानाची स्वच्छता त्याचबरोबर प्रशासनद्वारे सर्व प्रकारची प्रबंध व्यवस्था केली जात आहे. ज्यामुळे येणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये.
या प्रचार यात्रा आणि संत समागमाचा मूळ उद्देश ब्रह्मज्ञान द्वारा समाजातील अज्ञानाचा अंधकार मिटवणे तसेच संकीर्ण भावना आणि रूढीवादी नकारात्मक विचारांच्या भिंती पाडून आपापसामध्ये प्रेम आणि मिलवर्तनाची भावना वाढविणे हा आहे.

Google Ad

सन १९२९ पासून सुरु झालेले हे विश्व-व्यापक संत निरंकारी मिशन मानवता आणि विश्वबंधुत्वाचे मिशन असून सर्व जाती,धर्म संप्रदायासाठी खुले व्यासपीठ आहे. सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या पावन छत्रछायेखाली संपन्न होणाऱ्या या संत समागमाला पुण्या व्यतिरिक्त सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद येथून हजारो च्या संख्येने श्रद्धाळू भक्त उपस्थित राहून सद्गुरूंच्या पावन संदेशाचा लाभ घेणार आहेत.

या विशाल निरंकारी संत समागमामध्ये ब्रम्हज्ञान व सद्गुरुंच्या दिव्य संदेशाचा लाभ घेण्यासाठी समस्त भक्तांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!