Google Ad
Editor Choice

पाणी चोरी रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड मनपाचा … अनधिकृत नळजोडधारकांना मोठा झटका !

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९ एप्रिल) : पिंपरी चिंचवड शहरातील दिवसाआड होणारा पाणीपुरवठा, त्यात तांत्रिक बिघाडामुळे बदलणारे वेळापत्रक आणि उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. यामुळे शहराच्या अनेक भागातून पाण्याबाबत तक्रारी वाढत आहेत. त्यात पाणी चोरी व गळतीबाबतच्या तक्रारींचाही समावेश आहे. त्यांची दखल घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने हाती घेतलेल्या मोहिमेअंतर्गत दिनांक २९/०४/२०२२ रोजी प्रभाग क्रमांक २० फुले नगर येथे मनपाने थेट नळाला लावलेल्या एकूण १९ विद्युत मोटर्स जप्त केल्या.

पिंपरी चिंचवड शहरात नागरिकांना होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठय़ाची तपासणी मोहीम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून हाती घेण्यात आली आहे. त्या अंतर्गत सदर  ठिकाणच्या पाणीपुरवठय़ाची व्यवस्था तपासून कारवाई करण्यात आली.

Google Ad

सदर कारवाई ही उप अभि.श्री.सगर, श्री.मोरे
क.अभि.श्री. शाम गर्जे श्री. दिग्विजय पवार, श्री सन्मान भोसले, बीट निरीक्षक राजदीप तायडे, मीटर निरिक्षक धनाप्पा हटकर, प्लंबर वारे आणि भाईप, राज्य राखीव सुरक्षा बलचे २२ कर्मचारी, मनपाचे फिटर २,मजूर ६, वायरमन २,अतिक्रमण गाडी चालकासह १ अशा एकूण ३० जणांच्या पथकाने ही कारवाई केली.

सदर कारवाई इ प्रभागाचे उपअभियंता श्री प्रकाश सगर,आणि चंद्रकांत मोरे, कनिष्ठ अभियंता शाम गर्जे, दिग्विजय पवार,सन्मान भोसले यांच्या पथकाने , सह शहर अभियंता ,पाणीपुरवठा विभाग व कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा ह क्षेत्रीय कार्यालय यांचे मार्गदर्शनाखाली, करणेत आली.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!