Google Ad
Editor Choice Education

रहाटणीतील एसएनबीपी स्कूलला महापालिकेकडून ग्रीन स्कुलचे प्रशस्तीपत्र

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३० एप्रिल) : पुणे येथील एसएनबीपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूच्या रहाटणी येथील एसएनबीपी इंटरनॅशनल शाळेचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘ग्रीन स्कूलचे प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे.

या शाळेत विविध उपक्रमांच्या माध्यमातून हरित व स्वछ शाळा हा संदेश देण्यात आला आहे. शाळेच्या आवारात विविध प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत, शाळेच्या वतीने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने केलेले नियोजन, परिसर स्वच्छता ,हरित संकल्पना आदी निकषांवर महापालिकेच्या वतीने ग्रीन स्कूल म्हणून या शाळेची निवड केली आहे. महापालिकेच्या आधिकाऱ्यांनी शाळेत येऊन प्राचार्या जयश्री व्यंकटरमण यांच्याकडे ग्रीन स्कूलचे प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह सुपूर्द केले .

Google Ad

दरम्यान संस्थेच्या विविध शाखांमध्ये शिकत असलेल्या सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांनी नुकतेच वसुंधरा दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संदेश पत्रे लिहून “माती वाचवा” याविषयी जनजागृती करण्याचे आवाहन केले आहे.

संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विविध वयोगटातील विद्यार्थ्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी संदेश पत्राद्वारे संवाद साधत पर्यावरण संवर्धन, पृथ्वी वाचवा आदी विषयी आपल्या भावना व्यक्त केल्या . येरवडा, मोरवाडी, रहाटणी, चिखली, वाघोली आणि बावधन येथील शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

युनेस्कोने प्रवर्तित केलेल्या शाश्वत विकास योजनेच्या अनुषंगाने तरुण पिढीमध्ये जबाबदारीची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने संस्थेने हा उपक्रम हाती घेतला होता .“एकदा वापरा आणि प्लास्टिक पेन फेकून द्या” या उपक्रमासाठी संस्थेने पुढाकार घेऊन प्लास्टिक लँडफिल कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये लाकडांपासून तयार केलेले फाउंटन पेन लोकप्रिय करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून या पेनचे विद्यार्थ्यांना वाटपही केले आहे. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनीही शाळेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले आहे.

” विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात. प्रत्येक ठिकाणी असलेल्या शाळेत उत्तम शैक्षणिक सुविधांबरोबरच चांगल्या दर्जाच्या भौतिक सुविधाही पुरविलेल्या आहेत . शाळेचा परिसर स्वच्छ व पर्यावरणपूरक ,प्रसन्नदायी असेल याकडे लक्ष दिले जाते.

महापालिकेच्या वतीने ‘ग्रीन स्कूल’ प्रमाणपत्र देऊन झालेला हा गौरव यापुढील काळातही उत्कृष्ट कार्य करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल .”
_ डॉ. डी. के. भोसले ,
चेअरमन,एसएनबीपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट,पुणे

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!