Google Ad
Editor Choice

राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष ‘शशिकांत घुले’ यांच्या वतीने … बोपखेल परिसरात हायक्लो क्लोराईड सॅनिटायझर फवारणी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि२४ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील वाढती कोरोना बाधितांची संख्या चिंताजनक आहे. वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी शहरात १ जून पर्यंत कडकडीत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. रुग्णसंख्येच्या विस्फोटाला आळा घालण्यासाठी प्रशासनासह अनेक सामाजिक कार्यकर्ते देखील सर्वोतपरी प्रयत्न करीत असून आमदार आण्णा बसनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपाध्यक्ष शशिकांत घुले यांनी बोपखेल परिसरात हायक्लो क्लोराईड सॅनिटायझर फवारणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

शशिकांत घुले यांच्या संकल्पनेतून आज (२४मे) प्रभाग क्रमांक ४ बोपखेल परिसरातील शिव मल्हार मंदिर शिवनेरी कॉलनी नंबर-१ , शिवनेरी कॉलनी नंबर-२, शिवनेरी कॉलनी नंबर-३, केसरीनगर, शिवछत्रपती चौक या परिसरात सॅनिटायझर ची फवारणी करण्यात आली.

Google Ad

सॅनिटायझर फवारणी (हायक्लो क्लोराईड सॅनिटायझर) फवारणी करण्यात आल्याने शशिकांत घुले यांच्या या उपक्रमाविषयी शहरवासियांकडून समाधान व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात पुन्हा कोरोना महामारी डोके वर काढल्याची घुले यांनी गंभीर दखल घेवून परिसरातील नागरिकांना चांगले आरोग्य मिळावे याकरीता सॅनिटायझर फवारणीचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

18 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!