Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

‘वाल्मिक कुटे’ यांचा गोरगरीबांसाठी मदतीचा हात … गरजूंसाठी अन्नदान करत जपली सामाजिक बांधिलकी

महाराष्ट्र 14 न्यूज,(दि.२४मे) : सर्वसामान्य शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष व रहाटणी येथील सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक शंकर कुटे यांनी शहरातील विविध ठिकाणच्या गरजूंना अन्नदान तसेच किराणा मालाचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रोजगाराअभावी अनेक गरीब कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून दोन वेळचे जेवण मिळविणेही मुश्कील झाले आहे.या परिस्थितीत अशा कुटुंबीयांना आपल्या परीने दिलासा देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक कुटे यांनी आपले मित्र गणेश घाटोळकर यांना सोबतीला घेऊन ‘ अन्नदान हेच श्रेष्ठ दान’ या जाणिवेतून गोरगरीब जनतेसाठी अन्नदान केले.

Google Ad

कुटे यांनी आपल्या घरीच परिवारासमवेत विविध प्रकारचे जेवण तयार करून त्याचे वाटप केले. आकूर्डी येथील अनाथालय,अंध- अपंग बांधवांपर्यंत जाऊन त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. रस्त्यावर फिरणार्‍या निराधार व्यक्ती तसेच निराधार मुलांना अन्न तसेच बिस्कीटाचे वाटप करून माणुसकीचे दर्शन घडविले.तसेच कुटे यांनी आळंदी येथील वारकरी संस्थेमध्ये किराणा मालाचे वाटप केले.त्यांच्या या कार्याचे अनेकांनी कौतुक केले.यापूर्वीही वाल्मिकअण्णा कुटे यांनी गोरगरीब मुलांसाठी मदतकार्य केले असून गायींना चारा पुरवठा केला आहे.

आपल्या या समाजोपयोगी कामाबद्दल बोलताना वाल्मिक कुटे यांनी सांगितले की, हे काम प्रसिद्धीसाठी नाही तर यामधून इतरांनीही प्रेरणा घेऊन गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा हा उद्देश आहे. आपणही समाजाचे देणे आहोत या भावनेतून आपल्या परीने अन्नदानातून गरजूंची सेवा करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.यापुढील काळातही केवळ मदत न्हवे कर्तव्य समजून माणुसकी जोपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

11 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!