Google Ad
Editor Choice Pune

Pune : पुणेकरांना इशारा ! विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२४मे) : पुणे शहरात मंगळवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागातून वर्तविण्यात आली आहे. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास पुण्यात पावसाला (Rain) सुरुवात होईल. हा पाऊस मुसळधार स्वरुपाचा असू शकतो. त्यानंतर बुधवारी सकाळपासून पुण्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे मान्सूनचा पाऊस केरळच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. 27 मे ते 2 जून या कालावधीत केरळमध्ये मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. तर साधारण 1 जूनच्या आसपास मान्सूनचे केरळात आगमन होईल. त्यानंतर 8 ते 10 जूनच्या सुमारास मान्सून महाराष्ट्रात येऊन स्थिरावेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

Google Ad

तौक्ते चक्रीवादळानंतर आता वायव्य समुद्रकिनाऱ्यावर यास चक्रीवादळ धडकणार आहे. ओदिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांना या वादळाचा सर्वाधिक तडाखा बसण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे या वादळाची निर्मिती झाली आहे. यादृष्टीने आता केंद्र सरकारने पावले उचलायला सुरुवात केली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

101 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!