Google Ad
Editor Choice

वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरावठ्यामुळे नवी सांगवीकर हैराण … कोण, लक्ष देईल काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ ऑगस्ट) : नवी सांगवी च्या विविध भागात वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिक चांगलेच वैतागले आहेत. स्वामी विवेकानंद नगर, सनशाईन रेसिडेन्सी, समता नगर, गणेश नगर, आदर्श नगर, चैत्रबन, समर्थ नगर, संत तुकाराम नगर परिसरातील काही भागांमध्ये वीज पुरवठा वारंवार या ना त्या कारणाने खंडित होतो. तर काही भागांमध्ये वीजेचा लपंडाव सुरू असतो, कधी कधी तर १२ -१२ तास वीज गायब होते, आणि महावितरण ला माहीतही नसते, कोणी तक्रार करेल म्हणून अनेकजण वाट पाहत असतात, आता हा नित्याचा कार्यक्रम सुरू आहे, त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

त्यातच मनपाचा होणारा पाणीपुरवठा हा दिवसाआड असल्याने वीज नसल्याने नागरिकांनी छतावर बसविलेल्या पाण्याच्या टाक्या भरणे अवघड होते. मनपाच्या सुरू असलेल्या कामांमुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याचे महावितरण चे अधिकारी सांगतात. पाण्याची वेळ आणि वीज गायब होण्याची वेळ, आता नवी सांगवीतील नागरिक या नित्याच्या होणाऱ्या त्रासाला वैतागले आहेत.

Google Ad

नागरिकांची होणारी पिळवणूक आणि त्रासातून कायमची मुक्तता होण्याकरिता काहीतरी मार्ग काढावा, त्याकरिता “कोण लक्ष देईल काय”? … असा प्रश्न नागरिक करत आहेत.

मनपाच्या रस्ते खोदाईच्या कामांमुळे अनेक ठिकाणी केबल खराब झाल्या आहेत, आम्हीही दुरुस्ती शिवाय काही करू शकत नाही. त्या मुख्य केबल बदलल्या पाहिजेत. परंतु महावितरण विभागाकडे मागणी केली असता त्याकरिता तरतुद नाही. महानगरपालिका आयुक्त यांच्याशी मुख्य केबल बदलुन मिळाव्यात याकरिता पत्र व्यवहार केला आहे.

श्री काळे (अधिकारी महावितरण सांगवी विभाग)

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!