Google Ad
Editor Choice

लॉयन चषक २०२२’ स्पर्धेचे नवी सांगवीत भव्य उदघाटन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ ऑगस्ट) : : सांगवी-पिंपळे गुरव क्रिकेट क्लबच्या वतीने पावसाळी फुल पिच टेनिस व रबर बॉल स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. ‘लॉयन चषक २०२२’ या स्पर्धेचे शनिवार (दि. ६) रोजी सकाळी नऊ वाजता प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उदघाटन सोहळा उत्साहात पार पडला. ही स्पर्धा नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर घेण्यात आली आहे.

याप्रसंगी प्रमुख उपस्थिती उद्योजक तसेच माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप, स्वीकृत नगरसेवक महेश जगताप, नगरसेवक सागर अंघोळकर, अहिल्यादेवी सेवासंघ अध्यक्ष अजय दूधभाते, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कदम आदी मान्यवर यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी दोन्ही संघातील खेळाडूंना मान्यवरांनी हस्तांदोलन करून शुभेच्छा देण्यात आल्या.

Google Ad

या स्पर्धेत प्रथम पारितोषिक तीस हजार व चषक, द्वितीय पारितोषिक वीस हजार व चषक, तर तृतीय पारितोषिक दहा हजार व चषक देण्यात येणार आहे. ही स्पर्धा शनिवार (दि. ६) ते गुरुवार (दि. ११) रोजी खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेचे आयोजक अनिल माळी, सौरभ शिंदे, उमेश आव्हाडे, रोहित रणवरे, श्री पुष्कराज यांनी केले आहे. स्पर्धेच्या सुमारास प्रत्येक संघाला नियम व अटी लागू असणार आहेत.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!