Google Ad
Editor Choice

दोन हाताला काम मागणाऱ्या मजुरांनी लावले स्वच्छतेला दोन हात … स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्लगॉथोन मोहीम

महाराष्ट्र 14 (दि. ०६ ऑगस्ट) : पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक ०७ मध्ये आज दिनांक ०६/०८/२०२२ रोजी सकाळी ८.३० वाजता कै अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथील मोकळ्या मैदानात स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्लगॉथोन मोहीम घेणेत आली. कामगार नाक्यावरील मजूर वर्गाने मोठ्या संख्येने यामध्ये सहभाग नोंदविला. प्रभाग क्रमांक ७ मधील मनपा, संस्था कर्मचारी, बेसिक संस्था कर्मचारी, मनपा कर्मचारी वृंद यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमावेळी मा.सहा आरोग्याधिकारी राजेश भाट मुख्य आरोग्य निरिक्षक श्री राजू बेद आरोग्य निरिक्षक उध्दव डवरी आरोग्य मुकादम धनंजय गंगावणे, विजय कांबळे बेसिक संस्था सुपरवायजर स्नेहल गोरे बी.व्ही.जी संस्था सुपरवायजर रोहित झेंडे हे यावेळी उपस्थीत होते. सामूहिक स्वच्छतेची शपथ घेणेत आली. 57 किलो कचरा संकलित करणेत आला. इ क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे यांचे मार्गदर्शनाखाली सदर मोहीम राबविणेत आली.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!