Google Ad
Editor Choice Health & Fitness Maharashtra

माझे आरोग्य : सौंदर्य खुलवण्यासाठी मुलतानी मातीचा असा करा वापर

महाराष्ट्र 14 न्यूज : ( माझे आरोग्य ) आपल्या चेहऱ्याची त्वचा नितळ आणि मुलायम असावी यासाठी अनेकजण प्रयत्नशील असतात . विशेषतः मुलींमध्ये चेहरा चांगला दिसावा यासाठी विशेष प्रयत्न सुरु असलेले दिसतात . कधी चेहऱ्यावर येणारे पुरळ , डाग , कोरडेपणामुळे निघणारी स्कीन यांसारख्या समस्यांमुळे वैताग होतो . मग यावर नेमका कोणता उपाय करावा हे माहित नसल्याने त्याकडे दुर्लक्ष केले जाते . पण त्यामुळे ही समस्या आणखी वाढते . काहीजण चेहरा उजळण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांचाही वापर करतात .

तर काही जण पार्लरमध्ये जाणे पसंत करतात . पण भारतीय आयुर्वेदातील घटक असलेली मुलतानी माती चेहरा उजळण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते . तसेच चेहऱ्याचा कोरडेपणा दूर करण्यासाठीही या मातीचा लेप फायदेशीर ठरतो . चेहरा कोरडा पडणाऱ्यांसाठी या टिप्स नक्कीच उपयुक्त ठरतात . बाजारात ही मुलतानी माती सहज उपलब्धही होते . पाहूया या मुलतानी मातीचा नेमका कसा उपयोग केल्यास त्याचा फायदा होतो मध हाही एक उत्तम आयुर्वे दीक पदार्थ असून तो आरोग्याच्या विविध समस्यांसाठी फायदेशीर असतो .

Google Ad

चमचा मधात एक चमचा मुलतानी माती एकत्र करा . हा लेप चेहऱ्याला एकसारखा लावून तो मिनिटांसाठी ठेवा . त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा . मग चेहऱ्याला एखादे मॉईश्चरायजर लावा . चेहऱ्याचा कोरडेपणा दूर होण्यासाठी हा प्रयोग आठवड्यातून एकदा करा . एक चमचा मुलतानी मातीमध्ये ते थेंब गुलाबपाणी घाला . त्यात अर्धा चमचा चंदन पावडर घाला . हे मिश्रण योग्य पद्धतीने एकत्र करुन ते चेहऱ्याला लावा . हा लेप मिनिटे ठेऊन कोमट पाण्याने चेहरा धुवा . चेहरा उजळ होण्यासाठी ही प्रक्रिया आठवड्यातून वेळा करावी .

एक चमचा दही आणि एक चमचा मुलतानी माती एकत्र करा . हा लेप चेहऱ्यावर लावून तो पूर्णपणे वाळू द्या . मग कोमट पाण्याने चेहरा धुवा . दह्यातील घटक चेहऱ्यासाठी उपयुक्त असतात . हे मिश्रण मुलतानी मातीमध्ये एकत्र केल्याने त्याचा चांगला फायदा होतो . हळदीलाही आयुर्वेदात विशेष महत्त्व आहे . पाव चमचा हळद , चमचे मध आणि चमचा मुलतानी माती एकत्र करा . हे मिश्रण मिनिटे चेहऱ्याला लावून ठेवा आणि मग चेहरा पाण्याने धुवा .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!