Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

नवी सांगवीतील शनी मंदिरा शेजारील विद्युत डीपी वर काम करताना वीजकर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू!

महाराष्ट्र 14 न्यूज : विद्युत तारांची दुरुस्ती करण्यासाठी गेलेल्या लाईनमनचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. हनुमंत भिसे (वय ३३ वर्ष ) असे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लाईनमनचे नाव आहे.

भिसे हे पिंपरी चिंचवड मधील सांगवी येथे ते कार्यरत होते, नवी सांगवी येथील भागामध्ये रात्री पासून एक फेजच्या विजेची तक्रार असल्याची माहिती मिळाल्यानंतर भिसे आणि त्यांचे सहकारी हे, ही दुरुस्ती करण्यासाठी नवी सांगवी शनी मारुती मंदिरा शेजारच्या डीपी मध्ये काम करण्यासाठी आज ( मंगळवार ११ जुलै ) दुपारी १२.१५ वा.गेले असता, भिसे हे काम करण्यासाठी डीपी वर चढले आणि काही कळायच्या आतच विजेचा धक्का लागून लांब जमिनीवर फेकले गेले.

Google Ad

सोबत लाईनमन हरदेव शिवाजी सुळ आणि सहकारी होते, त्यांनी त्वरीत हालचाल करून भिसे यांना जिल्हा समान्य रुग्णालय औंध येथे घेऊन गेले, असता उपचारापूर्वीच ते मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हनुमंत भिसे हे सांगवी विधुत विभागात नोकरीस होते त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले असून ते पिंपळे गुरव येथे राहत होते, त्यांचे मूळ गाव हे लातूर असून अत्यंत कष्ठाळू असलेल्या भिसे यांच्या या आकस्मिक निधनाने त्यांच्या मित्र परिवारात हळहळ व्यक्त होत आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!