Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी” अभियानाचा नगरसेविका ‘निर्मला कुटे आणि नगरसेवक शत्रुघ्न काटे’ यांनी राहटणी – पिंपळे सौदागर येथे केला प्रारंभ!

महाराष्ट्र 14 न्यूज : लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली माझे कुटंब माझी जबाबदारी ह्या मोहिमेस आज रहाटनी-पिंपळे सौदागर येथे सुरुवात करण्यात आली. या भागातील नगरसेविका निर्मलाताई कुटे व नगरसेवक शत्रुघ्न बाप्पु काटे यांच्या सहकार्याने या अभियानाची सुरुवात करण्यात आली. संपुर्ण पिंपरी चिंचवड शहरात या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे.

रहाटनी,पिंपळे सौदागर कोरोना मुक्त करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येणार असून येथील नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी शासकीय यंत्रणा तपासणी करणार असली तरी ही मोहीम यशस्वी होण्यासाठी लोकसहभागही फार गरजेचा आहे.  त्यामुळे नागरिकांच्या जीवाचा विचार करून, या मोहिमेत एकत्रितपणे सहभागी व्हा. सर्व लोकप्रतिनिधी, नागरिकांनी स्वयंफुर्तीने सामाजिक बांधिलकी म्हणुन पुढे येऊन कोणताही संकोच न ठेवता, भीती न बाळगता तपासणीसाठी सहकार्य करा. या आरोग्य मोहिमेत सर्वांनी एकत्रितपणे सहभागी होण्याची गरज आहे.

Google Ad

“कोरोनाचे संकट वाढत असताना रहाटनी,पिंपळे सौदागर येथील जनतेचे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी महानगरपालिका व प्रभागातील नगरसेविका सौ.निर्मलाताई कुटे, नगरसेवक श्री शत्रुघ्न (बापु)काटे प्रयत्नशील आहे. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सर्व सुविधा उभारत आहोत. लॉकडाऊन काळातही त्यानी ही लाट थोपविली होती. मागील अनेक महिन्यांपासून प्रशासनासह अहोरात्र मेहनत करीत आहोत. मात्र आपले आव्हान अजून संपले नाही. वैद्यकीय उपचार किंवा तपासणी यात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करावा लागेल.

यासाठी लागणाऱ्या सर्व वैद्यकीय सामुग्री उपलब्ध करून देण्यात येईल. पल्स ऑक्सीमीटर, थर्मल गन, ॲटीजेन किट इ. साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या प्रभागातील नगरसेविका सौ.निर्मलाताई कुटे व नगरसेवक शत्रुघ्न (बापु)काटे व महानगरपालिका कटिबद्ध आहे.” यावेळी नगरसेवक नगरसेविका निर्मलाताई कुटे,नगरसेवक शत्रुघ्न बाप्पु काटे,भाजपा चिंचवड विधानसभा महिला मोर्चा अध्यक्षा कुंदा ताई भिसे,संजय भिसे, संजय कुटे, डॉ.प्रफुल्ल तपशाळकर,नर्स सौ.पुनम उपस्थित होते.

 

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

70 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!