Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

‘नगरसेविका करुणा चिंचवडे’ यांच्या पाठपुराव्याला अखेर यश … आहेरनगर मधील खंडित विजपुरवठ्याचा प्रश्न लागला मार्गी!

महाराष्ट्र 14 न्यूज : ठोस आश्वासन … ठोस कृतीतुन दिलेला शब्द पूर्ण केला..!! चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सहकार्याने व नगरसेविका करुणा शेखर चिंचवडे व शेखर चिंचवडे यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे गेली कित्येक वर्ष प्रलंबित असलेला पिंपरी चिंचवड शहरातील आहेरनगर येथील चिंतामणी कॉलनी ब मधील खंडित वीजपुरवठ्याचा प्रश्न आज मार्गी लागला.

प्रभागातील खंडित वीजपुरवठा आणि धोकादायक डी पी बॉक्स , कमी क्षमतेच्या केबल याबाबत सातत्याने MSEB कडे नगरसेविका करुणा चिंचवडे यांचा पाठपुरावा चालू होता, तसेच पिंपरी डिव्हिजन यांचेकडे देखील वारंवार पत्रव्यवहार आणि केबल बदलाची मागणी या साठी पाठपुरावा केला होता, चिंतामणी कॉलनी ब मध्ये वारंवार शॉर्ट होऊन केबल खराब झाली होती, असे असताना वारंवार वीजपुरवठा सलग ३-३ दिवस जाण्याचे प्रकार घडत असल्याने सर्व रहिवाशी त्रस्त झाले होते.

Google Ad

या प्रश्नाबाबत चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सहकार्याने MSEB अधिकाऱ्यांशी वारंवार चर्चा करून केबल उपलब्धत करून देण्यासाठी प्रयत्न करून आज अखेर त्याला यश आले, आज याठिकाणी प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली यावेळी चिंचवड सबवे चे अशोक जाधव व बिजलीनगर उपकेंद्रचे कल्याण जाधव यांचे सहकार्य लाभले. कामाचा शुभारंभ करताना नगरसेविका करुणा चिंचवडे, सुरेखा पाटणकर, वंदना जगताप मांढरे, ढेकणे, रांधवणे दादा, गुरव आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!