Google Ad
Editor Choice

संत निरंकारी मिशन तर्फे भारत देशातील १४ पर्वतीय ठिकाणी विश्व पर्यावरण दिवसाचे आयोजन…

महाराष्ट्र 14 न्यूज, (३ जून,२०२२) : संपूर्ण विश्वामध्ये ‘ विश्व पर्यावरण दिवस’ साजरा होत असताना यामध्ये योगदान देण्यासाठी संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन ,संत निरंकारी मिशनच्या सामाजिक शाखा द्वारा १०००० हुन अधिक स्वयंसेवक मिळून देशातील ७ राज्यांमधील १४ पर्वतीय ठिकाणी विशाल स्वच्छता आणि वृक्षारोपण अभियानाचे आयोजन करण्यात येणार आहे. ज्याच्या माध्यमातून पर्यावरण संकटाविषयी नागरिकांना जागृत होण्याची प्रेरणा देण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पर्यटक जास्त संख्येने जातात, अशा ठिकाणी या अभियानाचे आयोजन करण्यात येणार आहे. सध्या आपली पृथ्वी ग्लोबल वार्मिंग च्या संकटाबरोबर सामना करत आहे अशावेळी आपल्याला वृक्षारोपण सारखे अभियान राबविण्याची नितांत गरज आहे ज्याच्या माध्यमातून पर्यावरणाचे संतुलन राखण्यात मदत होईल.

यावर्षी संयुक्त राष्ट्राद्वारे स्वीडन ला ‘Only One Earth’ या शीर्षकासह २०२२ च्या जागतिक पर्यावरण दिनाचे यजमान म्हणून घोषित केले आहे. पर्यावरणवरील संकटाच्या वेळी प्रदूषणापासून सुटका मिळविण्यासाठी संपूर्ण जग एकसाथ प्रयत्न करत असताना संत निरंकारी मिशनचे हजारो स्वयंसेवक आपल्या खाकी वर्दी, तसेच चॅरिटेबल फॉउंडेशनचा निळा टी शर्ट व टोपी परिधान करून संबंधित शहरातील रहिवाश्यांच्या सहयोगाने वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान राबविणार आहेत .

Google Ad

पुणे जिल्ह्यातील लोणावळा व खंडाळा याठिकाणी याही वर्षी संत निरंकारी मिशन आणि लोणावळा नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान ५ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी १२.३० या वेळेत राबविण्यात येणार आहे. यामध्ये या परिसरातील विविध रस्ते ,टेकड्या ,धरण परिसर अशा आठ विभागामध्ये विभागणी करून या परिसरामध्ये स्वछता आणि वृक्षारोपण अभियान राबविण्यात येणार आहे. मिशनचे युवा स्वयंसेवक प्लास्टिक प्रदूषणाच्या थीमवर लघू नाटिकांचे आयोजन करून लोकांना पर्यावरण संकटाविषयी जागृत होण्याची प्रेरणा देतील. त्याचबरोबर नो प्लास्टिक युज /बिट एअर पोल्युशन /स्वछता व वृक्षारोपण विषयी संदेश देण्यासाठी बॅनर घेउन मानवी शृंखला द्वारे देखील संदेश देतील.

लोणावला व खंडाळा व्यतिरिक्त मसूरी,ऋषिकेश, लैंसडौन ,नैनीताल ,शिमला,नंदी हिल्स ,महाबळेश्वर ,पाचगनी ,पन्हाळा ,सापुतरा,माउंट अबू ,गंगटोक अशा १४ ठिकाणी हे अभियान मिशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले आहे.
पुणे झोन चे प्रभारी ताराचंद करमचंदानी यांनी नागरिकांना या अभियानमध्ये योगदान देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!