Google Ad
Editor Choice

Shirur : खैरेनगर विविध विकास सोसायटी निवडणूक २०२२ … जय हनुमान शेतकरी विकास पॅनलच्या विजयाची शिरूर तालुक्यात जोरदार चर्चा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३१ मे) : शिरूर तालुक्यातील खैरेनगर विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. खैरेनगर ची सन २०२२ ते २०२७ सोसायटीच्या व्यवस्थापन समितीची पंचवार्षिक निवडणुक जाहीर झाली आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये ०६ जून ला होणाऱ्या मतदानासाठी ११ जागांसाठी २२ उमेदवार रिंगणात आहेत.

खैरेनगर विविध विकास सोसायटी निवडणूक २०२२ जय हनुमान शेतकरी विकास पॅनल व हनुमान पाचपिर बाबा विकास पॅनल यांच्यातील लढत शिरूर तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे. खैरेनगर विकास सोसायटीची मागील पंचवार्षिक निवडणूक ही बिनविरोध झाली होती परंतु या कालखंडात मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याने सोसायटीच्या सभासदांमध्ये असंतोषाचे वातावरण तयार झाल्याने यावेळी निवडणूक ही बिनविरोध न होता, चांगल्या संचालकांची निवड होणे गरजेचे आहे, अशी परिस्थिती तयार झाल्याने निवडणूक चुरशीची होणार हे नक्की!

Google Ad

निवडणूकीचे वातावरण तापायला लागले असून स्थानिक भागात राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जय हनुमान विकास पॅनलला मतदारांची पसंती मिळत असल्याने यावेळी परिवर्तन होईल अशी तालुक्यात चर्चा आहे.

यामध्ये शिरूर तालुक्यातील सक्षम आणि सर्वात मोठी सोसायटी असल्याने या निवडणूकिकडे तालुक्यातील जनतेचे व गावातील मतदारांचे लक्ष लागले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!