Google Ad
Editor Choice Health & Fitness Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्णांकरीता आजपासून ‘जम्बो फॅसिलिटी’ … अशा असतील सुविधा!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने बेड कमी पडू लागले आहेत. त्यामुळे जम्बो फॅसिलिटी रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. आज ते पूर्ण झाले असून पिंपरी – चिंचवडमधील सेंटरचे आज उद्घाटन ‘ होणार आहे. पिंपरी चिंचवडमधील अण्णासाहेब मगर क्रीडांगण येथे ८०० खाटांचे सर्वाधिक बेड असलेले सेंटर उभारण्यात आले आहे . या सेंटरचे उद्घाटन बुधवारी करण्यात येणार आहे . बालेवाडी येथे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीतून ( सीएसआर ) २५० खाटांचे सेंटर उभारण्यात आले आहे . पिंपरी – चिंचवड महापालिकेने चिंचवड येथील सायन्स पार्कसमोरील ऑटो क्लस्टर येथे २०० खाटांचे सेंटर उभारले आहे . त्यांचे उद्घाटन येत्या शुक्रवारी करण्यात येणार आहे , ‘ अशी माहिती सौरभ राव यांनी दिली .

या सेंटर मध्ये अशा असतील सुविधा :-
जनरल बेड , ऑक्सिजन बेड , आयसीयू ( अतिदक्षता विभाग ) , व्हेंटिलेटर सुविधा येथे असेल . तसेच , रुग्णांवर मोफत उपचाराची सुविधा असून , सकल आहार , शुद्ध पाणीही दिले जाणार आहे . मंगळवारी ( ता . २५ ) ‘ सकाळ ‘ प्रतिनिधीने रुग्णालयाची पाहणी केली असून , उभारणी अंतिम टप्प्यात आली असल्याचे दिसले . आयसीयू , एचडीयू , ऑक्सिजन बेडसह जनरल बेडची व्यवस्था केली आहे . ऑक्सिजन वाहिन्यांची तपासणी व जोडणी केली जात होती . आपत्कालिन स्थितीसाठी अग्निरोधक यंत्रणा बसविण्याचे काम झाले आहे . प्रत्येक विभागात डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहेत . स्ट्रेचरसह व्हिलचेअरची सुविधा आहे .

Google Ad

 

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!