Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

कोरोना बाधित रुग्णांकडून जास्त दराने बिल आकारणी केल्याने डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटलला बजावली नोटीस!

महाराष्ट्र 14 न्यूज, २५ ऑगस्ट : संत तुकारामनगर येथील डॉ . डी.वाय . पाटील हॉस्पिटलला कोरोना बाधित रुग्णांकडून महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेल्या दरांपेक्षा जास्त दराने वैद्यकीय बिल आकारल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे तसेच याबाबत नोटीस मिळालेपासून ४८ तासांत खुलासा करणेबाबत कळविले आहे . पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील खाजगी रुग्णालयामध्ये कोविड -१९ या आजाराने बाधित झालेल्या रुग्णांची येणारी वैद्यकीय खर्चाची बिले हि अवास्तव रकमांची येत आहेत .

Google Ad

याबाबत लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून तक्रार प्राप्त झाल्याने रुग्णालयांनी आकारलेली खर्चाची बिले हि महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेल्या दरांनुसार असल्याबाबतची तपासणी करण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने श्री . एन.अशोक बाबू , सह आयुक्त , आयकर विभाग , पुणे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे . त्यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या समितीने संत तुकारामनगर येथील डॉ . डी.वाय . पाटील हॉस्पिटलकडील १७० रुग्णांच्या वैद्यकीय बिलांची तपासणी केली असता शासन निश्चित दरांपेक्षा जास्त दराने वैद्यकीय बिल आकारणी केल्याचे आढळून आल्याने हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे .

श्री . एन.अशोक बाबू यांच्या वैद्यकीय समितीने डॉ . डी.वाय . पाटील हॉस्पिटलला भेट देऊन तेथील वैद्यकीय बिलांची तपासणी केली असता हॉस्पिटलने लॅबोरेटरी चार्जेस व एचआरसीटी चेस्ट चार्जेस शासन निश्चित दरांपेक्षा जास्त आकारल्याचे दिसून आले . तसेच उपलब्ध खाटांची माहिती देणारे डॅश बोर्ड अद्यावत नसणे , लॅबोरेटरीमधील रिपोर्ट्स अपूर्ण असणे , वैद्यकीय सल्ल्याशिवाय रुग्णांना डिस्चार्ज देणे , कोरोनाबाधित रुग्णांना पीपीई कीट व औषधांसाठी वेगवेगळे दर आकारणे , रुग्णांची अपूर्ण संमती पत्रांवर स्वाक्षरी घेणे , रुग्णांची माहिती अद्यावत नसणे , कोरोना चाचणीचे दर आकारून त्याचे रिपोर्ट उपलब्ध नसणे आदीबाबत देखील हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे . डॉ . डी.वाय . पाटील हॉस्पिटलने वैद्यकीय समितीस वैद्यकीय बिले तपासणी दरम्यान योग्य ते सहकार्य न केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये याबाबत देखील हॉस्पिटल प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे . पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना बाधित रुग्णांकडून खाजगी रुग्णालयांनी ज्यादा वैद्यकीय बिल आकारले असल्यास याबाबत रुग्णांनी [email protected] a [email protected] a SHAT R तसेच ८८८८००६६६६ या क्रमांकावर आपली आपली तक्रार नोंदवावी असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे .

 

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

14 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!