Google Ad
Editor Choice Maharashtra

महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचे विविध मागण्यांसाठी पुणे जिल्हा सामान्य रुग्णालया (औंध) समोर निदर्शने!

महाराष्ट्र 14 न्यूज : महाराष्ट्र गवर्मेंत नर्सेस असोसिएशन पुणे यांचे वतीने विविध मागण्या मान्य करणे करिता निदर्शने करण्यात आली. पुणे जिल्हा सामान्य रुग्णालय प्रवेश द्वारासमोर सकाळी नर्सेस फेडरेशन चे वतीने निर्दशने करण्यात आली, यामध्ये प्रामुख्याने अनेक मागण्या करण्यात आल्या, रिक्त पदे भरण्यात यावीत कोविड सेवा संपल्या नंतर सात दिवस qurantine असावा , परिचारिकांना मिळणारे पीपीई किट, मास्क ग्लोज दर्जेदार असावे ,ज्या परिचारिका दर्धर आजार, हार्ट,मधुमेह असा परिचारिकांना कोविड सेवेतून सूट देण्यात यावी,परिचारिकांना चार तास नियोजित कामाची वेळ असावी,

पन्नास लाखाचा विमा परिचारिकांना तत्काळ लागू करण्यात यावा व परिचारिकांना सेवा देताना मृत्यू आल्यास अनुकंप तत्वावर वारसास सेवेत दाखल करून घ्यावे,बाधित परिचारिकांना रुग्णालयात वीस टक्के राखीव खाटा उपलब्ध असाव्यात ,मुंबई महापालिके प्रमाणे परिचारिकांना दर दिवशी ३०० रुपये भत्ता देण्यात यावा,
या वरील मागण्या शासनाने तातडीने पूर्ण करणे करिता पुणे नर्सेस असोसिएशन वतीने पुणे जिल्हा रुग्णालय प्रवेशद्वार वर सर्व परिचारिकांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी निदर्शने करण्यात आली यावेळी रुग्ण सेवा खंडित न करता काही नर्सेस ना सेवेत ठेवून निदर्शने करून परिचारिकांनी रुग्णाची काळजी घेतली,

Google Ad

सदर निदर्शने पुणे नर्सेस असोसिएशन चे अध्यक्ष श्रीमती सुमन टिळेकर,अतिरिक्त सचिव रेखा थिटे,औंध पुणे जिल्हा रुग्णालय चे सहसचिव श्रीमती प्रेरणा भद्रे, अरुणा जाधव यांनी निदर्शने आयोजित केली होती यावेळी रुग्णालयातील वैशाली कर्डिले, प्रियांका जाधव, सरवदे सिस्टर,सुनीता कुंभार, दीपा माने निवेदिता जवेहरी, मंगल पांढरे यांनी निदर्शने यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

13 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!