Google Ad
Editor Choice Maharashtra

Indapur : इंदापूर येथे सोमवारी पुणे-सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातात चारजण जागीच ठार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८जून) : भरधाव वेगातील कारचे टायर फुटून ती विरुद्ध बाजूच्या रस्त्यावर येत बोलेरोला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील एक व बोलेरोमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूरजवळील हॉटेल पायलजवळ सोमवारी (दि. 7) दुपारी 3 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

ज्योतिराम सूर्यभान पवार (वय 36, रा. उलवे, रायगड), अविनाश कुंडलिक पवार (28), गणेश पोपट गोडसे (38) व बाळासाहेब चांगदेव साळुंखे (49, तिघे जण, रा. गुरसाळे, सोलापूर) अशी मयत झालेल्या इसमांची नावे आहेत. सोलापूर बाजूकडून भरधाव वेगात पुण्याच्या दिशेने निघालेल्या इर्टिका (एमएच 46 बीई 4515) कारचे टायर अचानक फुटल्याने ती डिव्हायडर तोडून विरुद्ध बाजूच्या रस्त्यावर गेली.

Google Ad

सोलापूरकडे जाणाऱ्या बोलेरो (एमएच 13 एझेड 3901) या गाडीला तिची जोरदार धडक बसल्याने हा अपघात घडला.
अपघाताची माहिती कळताच सहायक पोलीस निरीक्षक संजय धोत्रे, सहायक फौजदार नितीन ठोंबरे, हवालदार मड्डी, जाधव हे तातडीने अपघातस्थळी पोहोचले. वाहनांमध्ये अडकलेले मृतदेह बाजूला काढले. पुढील तपासणीसाठी उपजिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले. वृत्त लिहीपर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!