Google Ad
Editor Choice Maharashtra

मराठा आरक्षणावर आज तोडगा ? पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भेटीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८जून) : राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा अद्यापही अधांतरी असून याबाबत चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रातील आघाडी सरकारचे नेते आज दिल्लीला रवाना होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

आज सकाळी 8 च्या जवळपास विशेष विमानाने पीएम नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी राज्यातील महाविकास आघाडीचे नेते रवाना होणार आहेत. या शिष्टमंडळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण मंत्री उपसमिती अध्यक्ष अशोक चव्हाण, मुख्य सचिव सिताराम कुंटे असणार आहेत. सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदी यांची भेट नियोजित असल्याच समजत. त्यासाठी मुंबईतून सकाळी स्पेशल चार्टर विमानाने शिष्टमंडळ जाणार असून पीएम मोदी यांच्या भेटीनंतर दिल्लीत महाराष्ट्र सदन येथे प्रेस घेणार आहेत. सायंकाळपर्यंत सर्व नेते मुंबईत परत येणार आहेत.

Google Ad

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यभरातील मराठा समाजाकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात केंद्राने, पंतप्रधानांनी पाऊलं उचलावी असं सांगितलं होतं. त्यानंतर केंद्राकडून सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!