Google Ad
Editor Choice india

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात तासभर चर्चा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८जून) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे एकूण 11 मागण्या मांडल्या आहेत. ओबीसी, मराठा आणि पदोन्नतीतील आरक्षणासह विविध मागण्यांचा त्यात समावेश आहे. मोदींनी या मागण्या गंभीरपणे ऐकून घेऊन त्यात लक्ष घालण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे हे प्रश्न सकारात्मकपणे सोडवले जातील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आदी नेते उपस्थित होते. त्यानंतर या नेत्यांनी पंतप्रधान मोदींसोबत मराठा आरक्षणावर सुमारे 1 तास 45 मिनिटे चर्चा केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला.

Google Ad

पंतप्रधानांना भेटण्यासाठी आम्ही तिघे आलो, सचिवहीसोबत आहेत. राज्याचे विषय कोणते, कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली हे सर्वांना माहीत आहे. सर्व विषय मोदींनी गांभीर्याने ऐकून घेतले. प्रत्येक विषयांची पत्रंही आम्ही दिली आहेत. राज्यांचे अनेक विषय मांडले. त्याबाबत मोदींनी लक्ष घालतो असं सांगितलं. मोदी हे प्रश्न सकारात्मकपणे सोडवतील अशी अपेक्षा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

▶️मुख्यमंत्र्यांनी मांडले 11 विषय

> मराठा आरक्षणाचा विषय आहे.
> दुसरा महत्त्वाचा विषय इतर मागासवर्ग आरक्षणाबाबतचा हा विषय देशपातळीवरचा आहे.
> मागासवर्गीय बढतीमधील आरक्षण
> चौथा मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गच्या जागेचा विषय
> जीएसटीचा विषय, वेळेवर जीएसटी येणे

> शेतकऱ्यांच्या आयुष्याशी निगडीत प्रस्न – पीक कर्ज असतं तसं पीक विमा आहे, त्याच्या अटीशर्तीबाबत चर्चा, महाराष्ट्रात बीड पॅटर्नची माहिती दिली
> राज्यांमध्ये पाल.. स्पर्धात्मक
> महत्त्वाचा विषय मुंबईमध्ये केली होती – गेली काही वर्षे महाराष्ट्रात किनारपट्टीच्या भागात चक्रीवादळं येत आहेत. मदतीचे निकष जुने झाले आहेत, ते बदलणे ९आवश्यक आहे, राज्य सरकारने गेल्यावर्षी निकष बदलून मदत केली. मुलात NDRF चे निकष बदलणे आवश्यक

> चौदाव्या वित्त आयोगातील थकीत निधी
> मराठा भाषेला अभिजात दर्जा मिळावा

Google Ad

About the author

Maharashtra14 News

10 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!