Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

दापोडीतील आनंदवन कुष्ठरोग वसाहतीमधील बहुविकलांग, अपंगांना स्वीकृत नगरसदस्य ‘अनिकेत काटे’ यांच्या प्रयत्नाने मिळाली जागेवरच लस

महाराष्ट्र 14 न्यूज,(दि. २९ मे २०२१) : दापोडी येथील आनंदवन कुष्ठरोग वसाहतीमध्ये आज कुष्ठरोग बाधितांचे कोविड-१९ प्रतिबंधात्मक एक दिवसीय लसीकरण करण्यात यावे, याकरिता स्वीकृत नगरसदस्य ‘अनिकेत राजेंद्र काटे’ यांनी मनपा आयुक्तांना निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत आज (दि.२९मे) रोजी आनंदवन कुष्ठरोग वसाहती मध्ये कोविड-१९चेलसीकरण करण्यात आले.

अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांनी या बाधितांसमवेत संवाद साधला, या कार्यक्रमास नगरसदस्या स्वाती उर्फ माई काटे, नगरसदस्य राजू बनसोडे, स्वीकृत सदस्य अनिकेत काटे, माजी नगरसदस्य राजेंद्र काटे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, सांगवी रुग्णालयाच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया आंबेडकर, महाराष्ट्र शासनाच्या कुष्ठरोग  नागरी पर्यवेक्षकीय पथकाचे वैद्यकीय सहाय्यक नागेश कोष्टी, अवैद्यकीय सहाय्यक श्रीलेखा बिजरे, आनंदवनचे सरपंच नवनाथ मगर, सामाजिक कार्यकर्ते सुरेखा दोडमणी, निलेश दोडमणी, विक्रम मानेकर, अनिल कांबळे, सचिन कोष्टी, लक्ष्मी कापसे आदी उपस्थित होते.

Google Ad

कुष्ठरोग बाधितांच्या वसाहतीमध्ये कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र आज कार्यान्वित करून येथील बाधित घटकांचे लसीकरण करण्याचे कार्य महापालिकेने केले, त्यामुळे मी मनपाचे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे डॉक्टरांचे आभार मानतो, असे यावेळी बोलताना अनिकेत काटे यांनी सांगितले.

कोरोना विरुद्ध लढण्यासाठी बळ कमी पडते असे वाटत असताना लोकप्रतिनिधी, महापालिका प्रशासन आणि नागरिक यांच्या सामुहिक प्रयत्नामुळे आणि सहकार्यामुळे आपण कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण रोखू शकलो. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेकजण योगदान देत आहेत. असेच सहकार्य कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेला रोखण्यासाठी आवश्यक आहे. कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी नियोजन केले जात असून सर्वांची साथ यासाठी आवश्यक आहे. कुष्ठरोग बाधितांना आवश्यक सर्व मदत करण्यास महापालिका पुढाकार घेऊन सेवेसाठी सदैव तत्पर असेल असे ढाकणे म्हणाले.

राजेंद्र काटे म्हणाले, कुष्ठरोग बाधितांना मदतीची गरज असून त्यांच्याकडे समाजाने सहानुभूतीने पाहावे आणि त्यांना आधार द्यावा.

 

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!