Google Ad
Editor Choice india Sports

Mumbai : आयपीएलचं ठिकाण ठरलं , उर्वरीत सामने होणारच , BCCI चा मोठा निर्णय

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनामुळे स्थगित झालेल्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI ने मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएलचे उर्वरित सामने आता संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईमध्ये होणार आहेत. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबतची माहिती दिली.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आज विशेष कार्यकारिणीचं (Special Genral Meeting) आयोजन केलं होतं. या बैठकीकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं होतं. कोरोनाच्या संकटामुळे स्थगित झालेल्या इंडियन प्रिमीयर लीगचे (IPL 2021) उर्वरीत सामने कधी होणार?

Google Ad

मात्र कोरोनाची दुसरी लाट आल्याने ऐन रंगात आलेली आयपीएल स्पर्धा 4 मे रोजी स्थगित करण्यात आली होती.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आज विशेष कार्यकारिणीचं (Special Genral Meeting) आयोजन केलं होतं. या बैठकीकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं होतं. कोरोनाच्या संकटामुळे स्थगित झालेल्या इंडियन प्रिमीयर लीगचे (IPL 2021) उर्वरीत सामने कधी होणार? याची उत्सुकता होती. अखेर BCCI ने हे सामने यूएईला होणार असल्याचं स्पष्ट केलं.

बीसीसीआयने आजच्या बैठकीत भारतातील कोरोना परिस्थितीसह हवामानाच्या मुद्यावरही चर्चा करण्यात आली. आयपीएलचे उर्वरित 31 सामने सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान घेणार आहेत. यादरम्यान भारतात पावसाचे वातावरण असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

10 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!