Google Ad
Editor Choice Maharashtra crimes Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीस्वाराने पोलिसाला नेलं फरफटत … नंतर झाली अटक

महाराष्ट्र 14 न्यूज,(दि.२९मे) : पिंपरी चिंचवड परिसरात एका दुचाकीस्वाराने वाहतूक विभागाच्या पोलीस कर्मचाऱ्याला रस्त्यावरून फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला असून पोलीसांनी आरोपी युवकाला अटक केली आहे. संबंधित जखमी पोलिसाने आरोपीची दुचाकी अडवून त्याच्याकडे कागदपत्रे आणि लायसन्सची विचारणा केली असता. आरोपीने वाहतूक पोलिसाला धक्का देऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला पकडण्यासाठी मागे धावलेल्या पोलीसालाच आरोपीनं फरफटत नेलं आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

संबंधित घटना पिंपरी चिंचवड परिसरात घडली आहे. येथील एका नाकाबंदी पॉईंटवर हिंजवडी वाहतूक विभागाचे हवालदार शंकर इंगळे ड्युटीवर होते. यावेळी संजय शेडगे नावाचा व्यक्ती समोरून आला. पोलीस हवालदार इंगळे यांनी त्याला थांबवून त्याच्याकडे लायसन आणि इतर कागदपत्रांची विचारणा केली. यावेळी लायसन आणि कागदपत्रे दाखवण्याऐवजी आरोपी शेडगे यानं इंगळे यांच्यासोबत हुज्जत घालायला सुरुवात केली. यानंतर त्याने इंगळे यांना धक्का देऊन दुचाकीवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला.

Google Ad

यावेळी वाहतूक पोलीस हवालदार इंगळे यांनी आरोपी संजय शेडगे याचा पाठलाग केला आणि पाठिमागून गाडी पकडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलीस हवालदार इंगळे यांचा हात दुचाकीच्या पाठिमागील फायबरमध्ये अडकला. पण आरोपीने दुचाकी वेगात पळवल्याने इंगळे दुचाकीसोबत फरफटत गेले. या घटनेत इंगळे यांना चांगलचं खरचटलं असून फरफटत नेणाऱ्या संजय शेडगे याला पोलिसांनी अटक केली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!