Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

चौकाचौकातील मोकाट वळूंना आवरण्याची मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीची मागणी!

महाराष्ट्र 14 न्यूज : सध्या सर्वत्र कोरोना आजाराने कहर केला आहे. लॉक डाऊनमध्ये शिथिलता मिळाल्याने नागरिक कामानिमित्त किंवा खरीदी करीता घराबाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे चौकाचौकात आता गर्दी दिसू लागली आहे, त्यातच सध्या शहरात दररोज मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. शहरातील अनेक ठिकाणी विकास कामे संथ गतीने चालू आहेत. रस्ते चिखलमय झाले आहेत. निसरड्या रस्ता मुळे वाहन चालवणे कठीण होऊन बसले आहे. त्यातच रस्त्याच्या मधोमध अनेक जनावरे ठाण मांडूण बसलेले आसतात. त्यामुळे अपघाचे प्रमाणात वाढ झाली आहे. चौका चौकात, गल्ली बोळात ,वळू मोकाटपणे फिरताना दिसत आहेत.शहरात सध्या वळूची दहशत निर्माण झाली आहे.

वळूंची टक्कर रस्त्यावर नागरिकांना नेहमीच पाहवयास मिळत आहे .याचा जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना, जेष्ठांना, वाहन चालकांना नाहक त्रास होत आहे. घाबरून पळ काढावा लागतो. असेच चित्र नवी सांगवीतील फेमस चौकात पहावयास मिळत आहे. नागरिकांमध्ये व वाहनचालकांमध्ये भिती वातावरण निर्माण झाले आहे. महानगरपालिकेने अशा मोकाट जनावरे,व वळूंचा बंदोबस्त करावा आशी मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीच्या वतीने संस्थाध्यक्ष विकास कुचेकर व शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, विकास शहाणे यांनी केली आहे. तसेच पालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे,अशी माफक अपेक्षा नागरिक करत आहेत.

Google Ad
Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!