Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड मनपा कर्मचाऱ्यांना कोविड कालावधीमध्ये मिळणार अतिकालीन भत्ता … कर्मचारी महासंघाच्या पाठपुराव्याला यश!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा संसर्ग चालू होऊन पाच महिने झाले रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशा कठीण प्रसंगी आपल्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता महानगरपालिका कर्मचारी म्हणजेच आजचे कोरोना योद्यांची धखल घेऊन त्यांना कोविड कालावधीमध्ये प्रोत्साहन भत्ता/ अतिकालीन भत्ता/ जोखीम भत्ता मिळावा याकरिता कर्मचारी महासंघ पाठपुरावा करत होता, त्यास आज यश आले. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या समवेत सोमवार १७ ऑगस्ट राजी बैठक झाली यात वरील विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

त्यामध्ये माहे जून २०२० पासून कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाप्रमाणे अतिकालीन भत्ता अदा करणेस मान्यता दिली व इतर भत्त्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली. यावेळी अतिरिक्त आयुक्त मा. श्री.संतोष पाटील , मा. श्री. अजित पवार मा. श्री प्रवीण तुपे , मुख्य लेखापरीक्षक मा. श्री कुंभोजकर , मुख्य लेखापाल मा. श्री कोळंबे, सहाय्यक आयुक्त (प्रशासन)मा. श्री मनोज लोणकर, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अबंर चिंचवडे व महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.या प्रसंगी मा.आयुक्त यांनी व्ही.सी. द्वारे मिटींगला मार्गदर्शन केले, अशी माहिती सुप्रिया सुरगुडे सरचिटणीस कर्मचारी महासंघ यांनी दिली.

Google Ad
Tags
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!