Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : धार्मिक स्थळांबाबत राज्य सरकाराने हायकोर्टात दिली ही माहिती!

महाराष्ट्र 14 न्यूज : राज्यातील प्रार्थनास्थळे खुली करण्याबाबत राज्य सरकारची भूमिका काय ? असा सवाल मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा विचारला . त्यावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तूर्तास तरी कोणतीही धार्मिक स्थळं किंवा प्रार्थना स्थळं खुली करण्याची परवानगी देता येणार नाही , असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे . पर्युषण बाबत राज्य सरकारनं जाहीर केलेली भूमिका ही सर्व धर्मियांसाठी लागू राहील . अनलॉक बाबत राज्य सरकारची नवी नियमावली जाहीर होत नाही , तोपर्यंत सध्याच्या परिस्थितीत बदल होणार नाही , असं राज्याच्या महाधिवक्त्यांनी म्हटलं आहे .

राज्य सरकारच्यावतीने महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी स्पष्ट केलं की , जैन धर्मियांच्या पर्युषण काळाशी संबंधित एका याचिकेत राज्य सरकारने प्रार्थना स्थळं खुली न करण्याबाबत आपली सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे . कोरोनाच्या साथीमुळे सध्या परिस्थिती सर्वसामान्य नाही . त्यामुळे प्रार्थना स्थळे कोविड 19 चा समूह संसर्ग वाढून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ मात्र संबंधित याचिका जैन मंदिरांसाठी होती . त्यामुळे या याचिकेवर राज्य सरकारने खुलासा करावा , असे निर्देश मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते – डेरे मोहिते – डेरे यांच्या खंडपीठाने दिले आहेत .

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

12 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!