Google Ad
Editor Choice Maharashtra Politics

हसीन जहाने केली राम मंदिरावर पोस्ट, मिळाली जीवे मारण्याची आणि रेपची धमकी !

महाराष्ट्र 14 न्यूज : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाने राम मंदिराच्या भूमी पुजनावर एक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट लिहिल्यानंतर हसीनला काही जणां कडून जीवे मारण्याची आणि रेपची धमकी देण्यात आली आहे.गेल्या कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर अयोध्येत राम मंदिर निर्माणाला सुरूवात झाली. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जय श्रीराम आणि ‘हर-हर महादेव’ च्या गर्जनेत मंदिराची कोनशिला स्थापन केली. यासाठी, दुपारी १२ वाजून ४४ मिनिटांच्या मुहूर्त निश्चित करण्यात आला होता. त्यानंतर हसीनने राम मंदिराच्या भूमी पुजनानंतर एक पोस्ट शेेेअर केली होती. ही पोस्ट तिच्या अंगलट आल्याचे पाहायला मिळत आहे. कारण या पोस्टनंतर तिला जीवे मारण्याची आणि रेपची धमकी देण्यात आली आहे.

हसीन जहाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ” समस्त हिंदू समाजाचे श्री राम मंदिरचे भूमी पुजन झाल्याबद्दल अभिनंदन. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सर्व देशवासियांनी एकत्र येऊन भाईचारा दाखवावा आणि भारताला जगापुढे विश्व शक्ती बनवावे.”हसीनने केलेली ही पोस्ट नक्कीच वाईट नाही. पण यापूर्वी हसीनने जे काही केले आहे. त्यामुळे तिच्या या पोस्टमुळे हसीन ट्रोल झाली आहे. हसीनने यापूर्वी मोहम्मद शमीवर गंभीर आरोप केले होते. त्याचबरोबर शमीच्या भावाने माझ्यावर रेप केल्याचेही सांगितले होते. त्यामळे चाहते हसीनवर नाराज झाले आहेत. काही जणांनी तिला जीवे मारण्याची आणि रेपची धमकी देण्यात आली आहे. या सर्व कमेंट अश्लील आणि विभत्स असल्यामुळे तुम्हाला दाखवू शकत नाही.

Google Ad

राम मंदिराच्या भूमी पुजनानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफचे एक ट्विट चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे. राम मंदिराच्या भूमी पुजनानंतर कैफने एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये कैफ म्हणाला की, ” अलाहाबाद या शहरात मी लहानाचा मोठा झालो आहे. त्यामुळे या शहराची संस्कृती मला चांगलीच माहिती आहे. ही संस्कृती गंगा-जमुना यांची आहे. मला रामलीला पाहणे फार आवडते आणि मी त्याचा चाहता आहे. भगवान राम हे प्रत्येक माणसामधील चांगले गुण पाहायचे. त्यामुळे त्यांचे हे विचार आपण पुढे न्यायला हवेत. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, जी लोकं द्वेष किंवा तेढ निर्माण करतात त्यांना प्रेम आणि एकताच्या मार्गावर येण्याची परवानगी देऊ नये.”

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!