Google Ad
Editor Choice india Politics

हा देश ‘या’ कंपनीकडून १० कोटी डोसची खरेदी करणार !

महाराष्ट्र 14 न्यूज : करोनाच्या संसर्गाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झालेल्या अमेरिकेत आजाराशी दोन हात करण्याची तयारी सुरू आहे. करोनाला अटकाव करणाऱ्या लशींची चाचणी सुरू असताना अमेरिकेकडून लस खरेदी करण्यात येत आहे. अमेरिकेकडून अधिकाधिक करोना प्रतिबंधक लस आणि औषधांचा साठा करण्यात येत असल्याचे चित्र आहे.

अमेरिकेत एक लाख ६० हजारांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. तर, करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अमेरिकेकडून करोनाला अटकाव करण्यासाठी उपाययोजना आखल्या जात आहेत. त्याशिवाय अमेरिकन सरकारने करोना प्रतिबंधक लस विकसित करण्यासाठी काही कंपन्यांना निधीदेखील दिला आहे. अमेरिकन सरकार आता जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला ४५ कोटी ६० लाख डॉलर दिले आहेत.

Google Ad

त्याशिवाय, फायजर आणि जर्मनी बायोटेक कंपनीकडून १९.५० डॉलर प्रति डोस दराने लस खरेदी करणार आहे. अमेरिकन सरकार जॉन्सन अँड जॉन्सनकडून १० कोटी डोस खरेदी करणार आहे. एका डोसची किंमत १० डॉलर असल्याची माहिती आहे. अमेरिकन आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला लशीकरण मोहिमेत सहभागी करून घेतल्यास ही लस मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

अमेरिका सरकार २० कोटी अतिरिक्त लस खरेदी करू शकते. जॉन्सन अँड जॉन्सनने म्हटले की, लस चाचणी यशस्वी झाल्यास २०२१ मध्ये करोना लशीची एक अब्ज डोस निर्मिती करण्यात येणार आहे. अमेरिका आणि जगभरात आपली लस निर्मितीची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे कंपनीने सांगितले.दरम्यान, जगभरात करोनाला अटकाव करणारी लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही लशींची चाचणी अंतिम टप्प्यात सुरू आहे. करोना लसीची चाचणीचा अंतिम टप्प्यातील परिणाम समोर आले नसतानाही कोट्यवधी लस खरेदी करण्यात येत आहे. सध्या तीन कंपन्यांची लस चाचणी अंतिम टप्प्यात आली असून ऑक्सफोर्ड विद्यापीठाने विकसित केलेली आणि चीनच्या दोन लशींचा समावेश आहे.

दरम्यान, रशियाने पुढील महिन्यांपासून करोनावरील लशीचे उत्पादन आणि वितरण सुरू करणार असल्याचे म्हटले होते. त्याशिवाय ऑक्टोबर महिन्यात लशीकरणाची मोहीम हाती घेणार असल्याचे म्हटले होते. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने रशियाच्या लशीवर शंका उपस्थित केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रवक्ते क्रिस्टीयन लिंडमियर यांनी सांगितले की, कोणत्याही देशाने तिसऱ्या टप्प्यातील चाचणी न घेताच लशीच्या उत्पादनासाठी परवानगी दिली तर त्याने मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!