Google Ad
Celebrities Maharashtra

Mumbai : ‘कहानी घर घर की’ शो फेम अभिनेत्याने केली आत्महत्या … पंख्याला लटकलेला मृतदेह आढळला!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड आणि छोट्या पडद्यावरील तारे आत्महत्या करत आहेत. टीव्ही अभिनेता समीर शर्माने आत्महत्या केली आहे. त्याने मुंबईतील आपल्या घरी आत्महत्या केली आहे. समीर शर्माने ‘कहानी घर-घर की’ या मालिकेत काम केले होते. याप्रकरणी मालाड पोलिसांनी एडीआर नोंदविला आहे.

समीर शर्मा (वय ४४ वर्ष) यांनी मालाड वेस्टमधील नेहा सीएचएस इमारतीत राहत्या घरी गळफास लावला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन – तीन दिवसांपूर्वी अभिनेत्याने आत्महत्या केली असावी. कारण जेव्हा पोलिस फ्लॅटच्या आत पोहोचले तेव्हा मृतदेह सडण्यास सुरवात झाली होती. मालाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीरने यावर्षी फेब्रुवारीमध्ये हे अपार्टमेंट भाड्याने घेतले होते. बुधवारी रात्रीच्या ड्युटी दरम्यान चौकीदाराला समीर शर्माचा मृतदेह लटकलेला दिसला. समीरचा मृतदेह किचनमध्ये पंख्याला लटकला होता. पोलिसांना सुसाइड नोट मिळालेली नाही. संपूर्ण घराचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणात पोलिस अधिक तपास करत आहेत.

Google Ad

समीर शर्मा कोण होते?
समीर शर्माने बर्‍याच टीव्ही शोमध्ये काम केले होते. त्यांनी कहानी घर घर की, ये रिश्ते हैं प्यार के, लेफ्ट राइट लेफ्ट, ज्योति, गीत हुई सबसे पराई, 2612, दिल क्या चाहता है, वीरानगली, वो रहने वाली महलों की, आयुष्मान भव, इस प्यार को क्या नाम दूं? एक बार फिर, भूतू , आजकाल तो ‘ये रिश्ते है प्यार के’ या मालिकेत शौर्य माहेश्वरीची भूमिका साकारत होता.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!