Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

दापोडी गणेश नगर मधील विद्युत विभागाची भेट घेऊन गोपाळ मोरे यांनी सोडविला सामान्य नागरिकांचा प्रश्न!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोना काळातील लॉकडाऊन मुळे दापोडीतील अनेक कुटुंब प्रमुखाचे रोजगार व नोकरी गेल्याने सर्वांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे, काहींची आर्थिक परिस्थिती कुठे सुधारण्याचा प्रयत्न होत आहे तर काहींची आर्थिक स्थिती अजुनही बिकटच आहे त्यात शाळा कॉलेज सुरु झाल्याने पालक वर्ग अजुन मेटाकुटीस आला आहे, परिस्थिती सुधारण्या एैवजी आणखिनच बेताची झाली आहे.

यातुन कशीतरी कसरत करीत असताना दापोडीतील रहिवाशांना विद्युत बिलाची थकबाकी भरावी म्हणुन विद्युत विभागाचे कर्मचारी मानसिक त्रास देवुन विजबिल भरण्याची सक्ती करुन बीजबील नाही भरले की वीजपुरवठा खंडीत करण्याची भाषा करत असल्याची तक्रार पिंपरी चिंचवड शिवसेना युवा नेते श्री. गोपाळभाऊ मोरे यांच्याकडे काही नागरिकांनी केली असता त्याची त्वरीत दखल घेवुन दापोडी गणेश नगर मधील विद्युत कार्यालयाला भेट देवुन संबंधित कर्मचारी व अधिकारी यांच्याशी चर्चा केली.

Google Ad

नागरिकांना त्रास न देता त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करावे जेणेकरुन नागरिक व वीज कर्मचारी यांच्यात वाद होणार नाही याची खबरदारी कर्मचारी वर्गाने घ्यावी व थकित विजबीलाची तीन टप्यात वीजबील भरण्याची मुभा द्यावी अशी सुचना त्यांनी यावेळी केली व काही तक्रारदार नागरीकांचे वीजबील त्वरीत तीन टप्यात करुन घेतले तसेच नागरीकांना वीजबील संदर्भात काही तक्रार असेल तर त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.यावेळी गणेश नगर मधील युवा नेते अँलेक्स मोझेस हेही उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

15 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!