Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

कौतुकाची थाप … आमदार ‘लक्ष्मण जगताप’ मित्र परिवाराच्या वतीने … चिंचवड विधानसभेतील ‘आदर्श माता-पिता’ आणि ‘कोविड योद्धा’चा सत्कार!

महाराष्ट्र 14 न्यूज : मनात भीती न बाळगता कोरोना काळात अनेक डॉक्टर, परिचारिकांसह आरोग्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी तसेच आरोग्य कर्मचारी, पोलिस, समाजिक संघटनेचे कार्यकर्ते या सर्वांनी कोरोनाग्रस्तांची सेवा केली. त्यांचे योगदान पाहाता, कोरोना महामारीच्या काळात लोकांची सेवा करणार्‍या योद्ध्यांचे मनोबल वाढावे, याकरिता आमदार ‘लक्ष्मण जगताप’ मित्र परिवाराच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत चिंचवड विधानसभा मतदार संघातील कोरोना योद्धा यांना सन्मानित केले.

महामारीच्या काळात लोकांची अथक परिश्रमाने सेवा करणारे कोविड योद्धे आठवले, की आजही थक्क व्हायला होते. आज ( दि.२२ फेब्रुवारी ) रोजी अशाच कोविड योद्धाचा पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळूफुले नाट्यगृहात चिंचवड विधानसभेचे आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘कोविड योद्धा’ आणि आदर्श ‘माता-पिता’ पुरस्कार सन्मान समारंभ दिमाखात पार पडला. या वेळी विविध क्षेत्रातील नामवंत कोविड योद्धांचा तसेच माता पित्यांचा सन्मान करण्यात आला.

Google Ad

यावेळी बोलताना महापौर ‘माई ढोरे’ म्हणाल्या समाज, राष्ट्र व मानवता प्रिय व्यक्ती अविरतपणे कार्य करून समाजासाठी काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करीत असतो त्यातील चांगलेपणा शोधून पुरस्कारासाठी निवड होते. मात्र हाच पुरस्कार पुढे ही अविरत व अखंडपणे कार्य करण्याची प्रेरणा देतो!

कोरोनाच्या संकट काळात आपला जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या चिंचवड विधानसभा मतदार संघातील कोरोना योद्धाचा आणि आदर्श माता पित्यांचा सत्कार पद्मश्री गिरीशजी प्रभुणे ( पिंपरी चिंचवड भूषण ज्येष्ठ समाजसेवक ) ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे ( देहूकर ) ( श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे विद्यामन वंशज ) ( देहू देवस्थान माजी अध्यक्ष ) ( विश्वस्त श्री . विठ्ठल रूक्मिणी मंदिर क्षेत्र पंढरपूर ) पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर केशव घोळवे, मा.नगरसेवक शंकरशेठ जगताप, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या शुभहस्ते मानचिन्ह, शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे अनेक नगरसेवक, नगरसेविका आणि मंडल अध्यक्ष, पदाधिकारी व नागरिक उपस्थितीत होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

2 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!