Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात २२ फेब्रुवारी पासून रात्री ११ ते सकाळी ६ यावेळत संचार प्रतिबंध … काय, आहेत सूचना – पहा सविस्तर!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोविड -१९ च्या प्रसारास पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत आयुक्त राजेश पाटील यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत .

१. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शैक्षणिक संस्था , प्राथमिक व माध्यमिक शाळा महाविद्यालये यांचे नियमित वर्ग तसेच खाजगी शिकवणी वर्ग या आदेशाच्या दिनांकापासून दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत पूर्णतः बंद राहतील .

Google Ad

२. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील मर्व अभ्यासिका ५० % क्षमतेने ( Social Distancing ) व Sanitization चे नियम काटेकोरपणे पाळून सुरू राहतील ,

३. मंगल कार्यालय ( खुले अथवा बंधिस्त ) या ठिकाणी २०० व्यक्तींच्या किंवा आसन अमतेच्या ५० % क्षमता यापैकी जे कमी असेल तेवढ्या उपस्थितीत लग्र समारंभ करणेस परवानगी राहील . तसेच ज्यांचेकडील लग्न आहे त्यांनी पोलिसांचे ना – हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक राहील .

४. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मंगल कार्यालये , हॉल , लॉन्स , सांस्कृतिक सभागृह , सर्व सामाजिक , धार्मिक , राजकीय , क्रीडा , मनोरंजन , सांस्कृतिक , शैक्षणिक उपक्रम , सभा , संमेलन , नाट्यगृह , चित्रपटगृहे , शॉपिंग मॉल , धार्मिक स्थळे , उद्याने व तत्सम मोठ्या संख्येने लोक एकत्र येवू शकतील अशा प्रकारने कार्यक्रमाने ठिकाणी , सर्व नागरिकांनी संचार करताना मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे . त्याच प्रमाणे यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार उपरोक्त नमूद सर्व ठिकाणी नागरिकांची गर्दी होणार नाही याची दक्षता संयोजकांनी घ्यावी . तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मनपा कार्यालये , सरकारी व खाजगी कार्यालयांमध्ये मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील .

५. सर्व हॉटेल , रेस्टॉरंट , बार , फूड कोर्ट रात्री ११:०० वाजेपर्यंतच सुरु राहतील .

६. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक कारण / सेवा वगळता दिनांक २२ फेब्रुवारी २०२१ पासून रात्री ११:०० ते सकाळी ०६:०० यावेळेत संचार करणेस प्रतिबंध असेल . यामधुन जीवनावश्यक वस्तूंचा ( दुध , भाजीपाला , फळे इ . ) , वृत्तपत्र सेवा व अत्यावश्यक सेवा पुरवणारे आस्थापना / व्यक्तींना व त्यांच्या वाहनांना वगळण्यात येत आहे .

७. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात नागरिकांनी संचार करताना मास्कचा वापर करणे अनिवार्य असून सामाजिक अंतर ( Social Distancing ) व सॅनिटायजेशनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील .

या आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. कोविड -१९ च्या प्रतिबंधासाठी या कार्यालयाद्वारे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे , मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६० तसेच भारतीय दंड संहितेचे कलम १८८ नुसार अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहील , सदर आदेश दि . २१ फेब्रुवारी २०२१ पासून पुढील आदेशापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात लागू राहतील, असे आयुक्त राजेश पाटील यांनी म्हटले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

142 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!