Google Ad
Editor Choice india

मोदी सरकारकडून पुन्हा एकदा स्वस्त सोनेखरेदी करण्याची सुवर्णसंधी … वाचा, कसा करून घ्याल फायदा!

महाराष्ट्र 14 न्यूज : केंद्र सरकार मागील काही वर्षांपासून फिजिकल सोन्याची मागणी कमी करण्याकरता एक खास योजना चालवत आहे. ‘सुवर्ण बॉन्ड’ असे त्या योजनेला नाव देण्यात आलं असून, याअंतर्गत मोदी सरकार पुन्हा एकदा सोने विकत आहे. बॉन्डच्या स्वरुपात सरकार सोन्याची विक्री करते. या सोन्याची किंमत रिझर्व्ह बँक ठरवते. वेळोवेळी या सोन्याची किंमत रिझर्व्ह बँकेकडून जारी केली जाते.

बाजारातील फिजिकल सोन्याच्या तुलनेत ही किंमत कमी आणि सुरक्षित असते. यावेळी रिझर्व्ह बँकेने सुवर्ण बॉन्डची किंमत ५,११७ रुपये प्रति ग्रॅम एवढी ठेवली आहे. बॉन्ड खरेदीसाठी डिजिटल पद्धतीने व्यवहार केल्यास प्रति ग्रॅम ५० रुपयांची सूट मिळणार आहे. अशा गुंतवणूकदारांच्या बॉन्डची किंमत ५,०६७ रुपये प्रति ग्रॅम एवढी असणार आहे.

Google Ad

ही योजना ३१ ऑगस्टला सुरु होऊन ४ सप्टेंबरला बंद होईल. यादरम्यान आपण सोन्याची खरेदी करु शकता. या योजनेत कमीत कमी एक ग्रॅम सोने विकत घेता येऊ शकते. हे सोने विकत घेण्यासाठी आपल्याला आपल्या बँक, बीएसई, एनएसईची वेबसाईट किंवा पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा लागणार. येथील सुवर्ण बॉण्ड डिजिटलपद्धतीने विकत घेतले जाऊ शकतात. ही एक प्रकराची अत्यंत सुरक्षित गुंतवणूक आहे. कारण यात सोन्याच्या शुद्धतेची आणि सुरक्षिततेची चिंता नसते.

२०१९-२० या आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेने दहा हप्त्यांत एकूण २,३१६.३७ कोटी रुपये अर्थात ६.१३ टनांचे सुवर्ण बॉन्ड जारी केले आहेत. तसेच कोरोना महामारीदरम्यान गेल्या ६ महिन्यांपासून बॉन्ड जारी करण्यात आले होते. सांगण्याचा हेतू हाच की, यावेळी गुंतवणूक टळल्यास आपल्याला आणखी काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ही योजना सुरु करण्यामागे केंद्र सरकारचा हेतू, आयात आणि फिजिकल सोन्याची मागणी कमी करणे असा आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!