Google Ad
Editor Choice Pune District

Baramati : बारामतीत होणार पुणे ग्रामीण पोलीसांचे उपमुख्यालय

महाराष्ट्र 14 न्यूज : पुणे ग्रामीण पोलिस दल अधिक कार्यक्षम होण्यासाठी , कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बारामती शहरानजीक ब-हाणपूर येथे पोलिस दलाच्या स्वत : च्या जागेत पोलिस उपमुख्यालय निर्मितीसाठी शासनाच्या गृह विभागाने शुक्रवारी ( दि .२८ ) मान्यता दिली . उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे ग्रामीण पोलिस दलाचे उपमुख्यालय बारामतीत व्हावे यासाठी गेल्या दहा वर्षांपासून प्रयत्नशील होते . मागील भाजप – सेना युती शासनाच्या काळात या कामाला ब्रेक लागला होता .

मात्र तत्पूर्वी आघाडी शासनाच्या काळात जागा निश्चिती करण्यात आली होती . या ठिकाणी मुख्यालयाची देखणी इमारत लवकरच उभी राहणार आहे . बारामती तालुक्यात राजकिय , शैक्षणिक , औद्योगिक व इतर कारणांमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त लागतो . तो इतर ठिकाणाहून मागवावा लागतो . पुणे जिल्ह्यातील दक्षिणेकडील हद्दीपर्यंत बंदोबस्त द्यावा लागत असल्याने अनेकदा विलंब होतो . या दरम्यान काही अघटीत घडल्यास उपलब्ध मनुष्यबळावर त्याचा विपरित परिणाम होतो . यासाठी बारामती शहरानजीक ब – हाणपूर येथे उपमुख्यालय स्थापनेचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता . त्याला राज्याच्या गृह विभागाने मान्यता दिली .

Google Ad

त्यामुळे ब – हाणपूरला उपमुख्यालय होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.ब – हाणपूर येथील उपमुख्यालयासाठी आवश्यक पदनिर्मितीबाबतचे आदेश स्वतंत्रपणे शासनाकडून काढले जाणार आहेत . या उपमुख्यालयाची सीमा यापुढील काळात घोषित करण्यात येईल . परंतु सध्याच्या बारामतीच्या अप्पर पोलिस अधिक्षकांचे कार्यक्षेत्र या उपमुख्यालयांतर्गत येण्याची शक्यता आहे . सध्या बारामतीच्या अप्पर पोलिस अधिक्षकांकडे बारामती , इंदापूर , दौंड , पुरंदर , शिरुर व भोर तालुक्याचा भाग येतो . हाच भाग बारामती उपमुख्यालयाला जोडला जाईल , अशी चिन्हे आहेत .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

23 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!