Google Ad
Editor Choice Maharashtra

Junner – राष्ट्रवादीच्या आणखी एका धडाकेबाज आमदाराला कोरोनाची लागण … उपचारासाठी रुग्णालयात दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज – राष्ट्रवादीचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: फेसबुक पोस्ट करून त्यांनी ही माहिती दिली आहे. तसंच उपचारासाठी रूग्णालयात भरती झाल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. २७ तारखेला त्रास जाणवू लागल्याने काळजी म्हणून कोरोना चाचणी केली मात्र काल केलेल्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने मी हॉस्पिटलमध्ये अ‌ॅडमिट आहे, अशी माहिती त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे.

कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मागील काही दिवसांत ज्या व्यक्ती व सहकारी माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी काळजी म्हणून स्वतःची चाचणी करून घ्यावी, असं आवाहन देखील अतुल बेनके यांनी केलं आहे. आज मी स्वतः कोरोनाबाधित झालो असलो तरीही, आपल्या सेवेचे कार्य थांबणार नाही. मी जेथे असेल तेथून कोरोना परिस्थितीचा आढावा घेणे सुरू राहील, असं म्हणत हा लढा आपण जिंकणारच असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

Google Ad

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

120 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!