Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड शहरात रात्री ८ वाजल्यापासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत हे नियम पाळा … अन्यथा होऊ शकतो एवढा दंड

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि.२८ मार्च ) : कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात दि . २८ मार्च २०२१ चे मध्यरात्रीपासून रात्री ८:०० ते सकाळी ७:०० या वेळेत ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे . सदर आदेशाचा भंग करणा – या व्यक्तीस प्रत्येकी रक्कम रुपये १००० / – याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल .

🔴 सर्व सार्वजनिक ठिकाणे रात्री ८:०० ते सकाळी ७:०० या वेळेत बंद राहतील . सदर आदेशाचा भंग करणा – या व्यक्तीस प्रत्येकी रक्कम रुपये १००० / – याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल .

Google Ad

🔴 पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व दुकाने ( अत्यावश्यक वस्तू व सेवा जसे मेडिकल बगळून ) , हॉटेल , रेस्टोरंट , बार फूडकोर्ट , सिनेमागृह ( Single Sreen and Multiplex ) नाट्यगृह । प्रेक्षागृह इ . आस्थापना रात्री ८:०० ते सकाळी ७:०० या वेळेत बंद राहतील . तथापि , हॉटेलमार्फत पार्सल सेवा | घरपोच सेवा सुरु राहील . सदर नियमांचा भंग झाल्यास मे.केंद्र शासन कोविड -१९ आपत्ती संपुर्णपणे संपली असे घोषित करेल त्या दिवसापर्यंत संबधित आस्थापना बंद करण्यात येतील . तसेच आस्थापनाचे मालकाविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल .

🔴 पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात सर्व प्रकारचे सामाजिक , राजकीय , धार्मिक , सांस्कृतिक कार्यक्रम , सभा संमेलने यांस संपुर्णत : प्रतिबंध राहील . त्याच अनुषंगाने भूमी पूजन , उदघाटन समारंभ व तत्सम मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊ शकतील अशा प्रकारचे सर्व कार्यक्रमास संपुर्णतः प्रतिबंध राहील . नाट्यगृह / प्रेक्षागृह या ठिकाणी देखील सदर कार्यक्रम करणेस प्रतिबंध राहील . सदर नियमांचा भंग झाल्यास मे , केंद्र सरकार कोविड -१९ आपत्ती संपुर्णपणे संपली असे घोषित करेल त्या दिवसापर्यंत संबधित आस्थापना बंद करण्यात येतील . तसेच आस्थापनाचे मालकाविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल .

🔴 लग्न समारंभ कार्यक्रम जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील . सदर नियमांचा भंग झाल्यास मे . केंद्र शासन कोविड – १ ९ आपत्ती संपुर्णपणे संपली असे घोषित करेल त्या 14 दिवसापर्यंत संबधित आस्थापना बंद करण्यात येतील . तसेच आस्थापनाचे मालकाविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल .

अंत्यसंस्कार , दशक्रिया व त्यांच्याशी निगडीत कार्यक्रम जास्तीत जास्त २० लोकांच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील .

🔴पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व उद्याने पुर्णत , बंद राहतील ,

🔴 Home Isolation साठी खालील मार्गदर्शक सुचना / अटींचे अवलोकन करावे .सहाय्यक आयुक्त / क्षेत्रिय अधिकारी , झोनल अधिकारी ( Incident Commander ) यांना Home Isolation वावत नागरिकांनी संपुर्ण माहिती देणे बंधनकारक आहे . तसेच Home Isolation मध्ये असताना घेण्यात येणा – या वैद्यकिय उपचारांबाबत संबंधित क्षेत्रिय कार्यालय यांना माहिती देणे आवश्यक आहे .

 सहाय्यक आयुक्त । क्षेत्रिय अधिकारी , झोनल अधिकारी ( Incident Commander ) यांनी कोविड पॉझिटिव्ह रुग्ण झाल्यापासून १४ दिवसांचा विलगीकरण कालावधी दर्शविणेबाबत फलक दरवाजावर अथवा दर्शनी भागावर लावणेबाबत कार्यवाही करावी .

> कोविड पॉझिटिव्ह रुग्णांच्या हातावर शिक्का मारणे बाबतची कार्यवाही सहाय्यक आयुक्त । क्षेत्रिय अधिकारी , झोनल अधिकारी ( Incident Commander ) यांनी करावी . > कोविड पॉझिटीव्ह रुग्णांचे घरातील नातेवाईकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये . आवश्यक असल्यास मास्क परिधान करुन घराबाहेर पडावे . Home Isolation बावत कोविड पॉझिटीव्ह रुग्णांकडून सदर नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास त्या प्रभागातील सहाय्यक आयुक्त / क्षेत्रिय अधिकारी , झोनल अधिकारी ( Incident Commander ) अशा रुग्णांना कोविड केअर सेंटर येथे त्वरित स्थलांतरित करणेबाबत कार्यवाही करतील .

🔴 पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खाजगी कार्यालये ( वैद्यकिय , आरोग्य व अत्यावश्यक सेवा वगळून ) ५० % मनुष्यबळासह सुरु ठेवता येतील . तसेच शासकीय / निमशासकीय कार्यालये बाबतीत त्यांचे कार्यालय प्रमुखांनी कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांचे उपस्थिती बाबत निर्णय घ्यावा . मात्र त्यांनी कोविड – १ ९ संदर्भात मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे . उत्पादन क्षेत्र संपूर्ण क्षमतेने सुरु ठेवता येतील . मात्र त्यांनी कामाच्या ठिकाणी सोशल डिस्टसिंग पाळले जाईल यानुसार कर्मचारी यांचे उपस्थितीचे नियोजन करावे . संबधित आस्थापनांनी कामगारांकडून मास्कचा वापर व सामाजिक अंतर राखणे याबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणेच्या दृष्टीने वेगवेगळ्या शिफ्टमध्ये ( सकाळ , दुपार , रात्रपाळी ) कामाचे नियोजन करावे . वरील आस्थापनांनी खालील मार्गदर्शक सूचना / अटींचे पालन करणे बंधनकारक राहील
> नागरिकांना / कर्मचा – यांना विना मास्क प्रवेश देता येवू नये .
> प्रवेशव्दारावर Thermometer , Thermal Scanner / Gun , Pulse oxymeter ब्दारे तपासणी करण्यात यावी . > कोविड -१ ९ संदर्भात लक्षणे नसलेल्या नागरिकांना / कर्मचा – यांना प्रवेश देण्यात यावा . ताप , सर्दी , खोकला यासारखी लक्षणे असलेल्या नागरिकांना / कर्मचा – यांना प्रवेश देऊ नये . > संबंधित आस्थापना चालकांनी नागरिकांसाठी / कर्मचा – यांसाठी हेन्ड सेंनिटाईजर उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे .


> नागरिकांकडून / कर्मचा – यांकडून मास्कचा वापर व सामाजिक अंतर पाळणे याबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होते किंवा कसे याबाबत नियंत्रणाकरिता संबंधित आस्थापनांनी पुरेसे कर्मचारी नियुक्त करावेत .
> सदर नियमांचा भंग झाल्यास मे.केंद्र सरकार कोविड -१ ९ आपत्ती संपूर्णपणे संपली असे जाहीर करत नाही तोपर्यंत संबंधित आस्थापना बंद करण्यात येतील . तसेच आस्थानांचे मालकाविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल .

🔴शासकीय कार्यालयातील गर्दी टाळण्यासाठी सर्व शासकीय कार्यालयात नागरिकांना ( निर्वासित सदस्य , पदाधिकारी वगळून ) अत्यावश्यक काम वगळता कार्यालयात येण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे . तथापि , बैठकी करीता निमंत्रित केलेल्या नागरिकांना संबंधित विभाग कार्यालय प्रमुख यांनी प्रवेश पत्र देण्याची व्यवस्था करावी .

 

🔴सर्व धार्मिक स्थळांच्या ठिकाणी सामाजिक अंतर तसेच तेथील जागेची उपलब्धता पाहून सामाजिक अंतर पाळण्याच्या अनुषंगाने किती नागरिकांना प्रवेश देता येईल याची निश्चिती व्यवस्थापन / ट्रस्ट यांनी करावी . आणि जरुरतर ऑनलाईन पासची व्यवस्था करण्यात यावी . १५ ) सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ( पीएमपीएमएल ) ५० % क्षमतेने सुरु राहील . सदर नियमांचा भंग झाल्यास र.रु .५०० / -प्रमाणे दंडात्मक कारवाई करावी .

🔴संदर्भीय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील . १७ ) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने यापूर्वी केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील . कोविड -१ ९ च्या प्रतिबंधासाठी या कार्यालयाब्दारे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे मार्गदर्शक चे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६० , तसेच भारतीय दंड चे कलम १८८ नुसार अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कार्यवाहीस पात्र राहील , असे आदेश दि .२८.०३.२०२१ पासून पुढील आदेशापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

69 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!